मुकटी येथील जि.प.कन्या शाळेचा पहिला दिवसाचा विद्यार्थिनींच्या उपस्थित शाळेचे पटांगण स्वच्छ करून रांगोळ्या काढण्यात आल्या,सर्व वर्ग निर्जंतुक करून विद्यार्थिनींना गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले,यावेळी विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.यावेळी गावातील नवनिर्वाचित सरपंच सौ.अर्चना पाटील यांनी शालेय परिसर व वर्ग वार भेट देऊन समाधान व्यक्त केले, तसेच या कार्यक्रमात कृ.बा.समितीचे प्रशासक रितेश पाटील.शा.व्य. समितीचे सदस्य पंकज पाटील.सरपंच सौ.अर्चना पाटील शाळेचे मुख्याध्यापक कैलास देसले,उपस्थित होते,यावेळी शाळेचे शिक्षक जगदीश लोहार,श्रीमती. योजना शेवाळे, श्रीमती, हेमलता पाटील,श्रीमती.सरोजनी वानखेडे,श्रीमती. सूनंदा महाले,श्रीमती. ज्योती चव्हाण, सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
Tags
news
