शिरपूर तालुक्यातील बभळाज येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत दिनांक 1 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांचे स्वागत व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून थाळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील, उपसरपंच अनिल त्रिभुवन ,पोलीस पाटील नितीन जाधव ,आबा भिसे ,नन्ना जाधव,श्री. बी एस बुवा (शिक्षण विस्तार अधिकारी होळनांथे बीट), प्रविण मराठे (केंद्रप्रमुख तरडी), आदी उपस्थित होते याबाबत सविस्तर वृत्त असे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 1 डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना प्रवेशद्वारापासून वर्गा पर्यंत नेण्यात आले कोरोना च्या पार्श्वभूमीवर गेल्या पावणेदोन वर्षांपासून शाळा बंद होत्या शाळेची मोठी उत्सुकता असल्यामुळे पहिल्या दिवशीच चिमुकल्यांनी शाळेत मोठी गर्दी केली. शाळेत आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. याप्रसंगी या शाळेतील माजी विद्यार्थी नितीन जाधव पोलीस पाटील, प्रवीण पाटील, राजमल पाटील, मुकेश पाटील ,गणेश पाटील ,मुरलीधर ठेलारी, धर्मेंद्र राजपूत ,प्राध्यापक श्रीकांत महाजन, जयवंत पाटील, अजित राजपूत ,संदीप पाटील , समाधान पाटील यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना वही-पेन ,मास्क, बालमित्र पुस्तक वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन श्री किरण पाटील तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक श्री. वासुदेव चाचरे यांनी केले
Tags
news
