शिरपूर - शिरपुर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरेश शिरसाठ यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती प्राप्त झाली की,, शिरपुर तालुका पोलीस स्टेशन हददीतील इसम नामे रामा रुमाल्या पावरा रा. लाकडया हनुमान ता. शिरपुर याने त्याचे चिलारे, टिटावापाणी गावाचे शिवारात धरणाजवळ असलेल्या शेतातील झोपडीत सुका गांज्या अंमली पदार्थाचा साठा केलेला आहे. सदर प्राप्त गुप्त माहितीच्या अनुशंगाने स.पो.नि./शिरसाठ यांनी शिरपुर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन दिनांक ०१/१२/२०२१ रोजी बातमी चे ठिकाणी १७.३० वाजता छापा टाकला असता आरोपीचे झोपडीत असलेल्या गोणीत गांजा मिळुन आला असुन आरोपी हा फरार आहे. या ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांना
१) 93,600 /- रुपये कि. चा एकुण 9.360 किलो ग्रॅम निव्वळ वजनाचा गांजा सदृश्य
अंमली पदार्थ हिरवट रंगाचा पान बिया व काडयाचा चुरा असलेला
सुकलेला व उग्र वासाचा प्रती किलो सुमारे 10,000/- रुपये दराचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री प्रवीणकुमार पाटील सो. धुळे मा. अपर पोलीस अधिक्षक मा. श्री प्रशांत बच्छाव सो. धुळे मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री ईश्वर कातकाडे सो. शिरपुर विभाग यांचे मार्गदर्शना खाली सपोनि / सुरेश शिरसाठ, प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री धर्मराज पाटील मोटार वाहन निरीक्षक, सीमा तपासणी नाका हाडाखेड ता. शिरपुर (राजपत्रीत अधिकारी), पोसई / नरेंद्र खैरनार, असई/लक्ष्मण गवळी पोहेकॉ./गंगाराम सोनवणे, पोहेकॉ/ संजय देवरे, पोहेकॉसईद शेख पोना/संदीप शिंदे, पोकॉ/रोहिदास पावरा, पोकॉ/योगेश मोरे व चालक पोकॉ/इसरार फारुकी व शिरपुर वनविभागाचे श्री. मनोज पाटील व संजय इंडे यांनी केली असुन पोकॉ/रोहिदास पावरा यांचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला असुन तपास सपोनि / सुरेश शिरसाठ हे करीत आहेत.
Tags
news


