मालपूर ग्रामविकासआधिकारींनी मुख्यालयीन कायमस्वरुपी राहण्याची मागणी.




मालपूर वार्ताहर. ता.शिंदखेडा येथील ग्रामपंचायतीत कार्यरत असलेले ग्रामविकास आधिकारी हे  शिरपूरहुन मालपूर प्रवास करतात वेळेवर हजर राहत नाहीत अशी चर्चा गावकर्‍यात  होत आहे.
मालपुरग्रामपंचायत हि १७सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत आहे.व ग्रामपंचायतचा कारभार ही तेवढाच मोठा आहे. असे असुनही ग्रामविकासआधिकारी श्री.एल.सी.पाटील हे ऊशिरा येत असतात. गावकर्‍यांना दाखले व शैक्षणीक कामासाठीलागणारे दाखल्यासाठी  फिरत असतात .  मुख्यालयीन  का रहात नाहीत?असा प्रश्न गावकर्‍यांना सतावत आहे.
एवढेच नव्हे तर शासकिय दिवसाला देखील हजर  न राहणे. आताच संविधान दिवसाला देखील दांडी मारल्याचा दिसुन आले . तरी अशा दांडी बहादुर आधिकार्‍याला  थोडी कर्तव्याबद्दल जाणीव ठेवली पाहिजे.? याची दखल वरिष्ठ पातळीवरील आधिकार्‍यांनी लक्ष देणे महत्वाचे आहे.सकाळी ८ते ५वाजे पर्यत हजर राहणे बंधन कारक असुन तशी समज दिली पाहिजे.जेणे करुन नागरिकांच्यामुलभुत गरजापूर्ण होतील.ग्रामस्थांचे हाल होणार नाही.याची काळजी घ्यावी.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने