शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे तीन रेशनदुकानदार आहेत माञ शासनाचा मोफत धान्य देतआहेत परंतु तांदुळ खराब आहेत ते शेळ्यामेंढ्या देखील खात नाहीत आम्ही तर माणसे आहोत सरकारला विनंती आहे कि चांगला माल देत चला. तांदुळात चुरीचा प्रकार जास्त आहे. रेशनदुकानदार म्हणतात वरुन जसा माल मिळतो तसा आम्ही तुम्हाला देतो.
यावरुन तक्रार करायची तर कोणाकडे असा सवाल लाभार्थी गिर्याईक करित आहेत. धान्यात भेसळ हे आधिकार्यांना दिसत नाही काय?. फक्त दिसते गुटका विक्रीवाले. येथे जरा बघा गोरगरिब लोकांनकडे. व रेशनचा माल चांगला येत नाही याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी लोक करत आहेत.
Tags
news
