अवनी* *चा प्रथम वाढदिवस साजरा केला डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी वृक्ष व ट्री गार्ड भेट देऊन!! जिल्हा प्रतिनिधी कडून *शैक्षिक आगाज व निसर्ग पर्यावरण मंडळाचा उपक्रम*



भुसावळ येथील भुसावळ विभागाचे डी वाय एस पी सोमनाथ वाघचौरे यांनी आपली कन्या अवनी चा प्रथम वाढदिवस स्टार लॉन येथे सायंकाळी  केक कापून तसेच आलेल्या सर्व मान्यवरांना वाढदिवसाच्या निमित्ताने फळाचे रोप व ट्री गार्ड देऊनlसाजरी करण्यात आला. यावेळी स्वर साधना संगीत विद्यालयाच्या सौ स्मिता कुलकर्णी व त्यांच्या टीमने भावगीते भक्तिगीते सादर केली त्याचबरोबर संदीप बडगे व मोहम्मद अली सय्यद यांनीही याप्रसंगी सुंदर गीत गायन केले . अवनी च्या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष व ट्री गार्ड वितरणाबाबत शैक्षिक आगाज चे राज्य समन्वयक व निसर्ग पर्यावरण मंडळाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी या उपक्रमाविषयी माहिती दिली . यावेळी वाढदिवसाच्या निमित्ताने वाघचौरे परिवाराकडून दिलेली वृक्षाची व ट्री गार्ड भेट प्रत्येकाने वाढदिवसाच्या आठवणी रूपाने वृक्ष के संवर्धन आणि संगोपन करावे असे आवाहन डी वाय एस पी सोमनाथ वाघचौरे यांनी केले. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे उपस्थित सर्व मान्यवरांनी वाघचौरे परिवाराचे टाळ्यांच्या गजरात स्वागत अभिनंदन आणि कौतुक केले अशा प्रकारचे उपक्रम समाजामध्ये व्हावेत अशा प्रतिक्रिया मान्यवरांकडून येत होत्या.या उपक्रमासाठी निसर्ग पर्यावरणाचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील सल्लागार सुरेंद्र सिंग पाटील जिल्हा महाविद्यालय प्रमुख निशांत पाटील, वेदांत कुलकर्णी तसेच समता फाउंडेशन व त्यांचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले यावेळी खंडाळ्याचे हर्षल पाटील यांनी याकामी सहकार्य केले .या कार्यक्रमाला महसूल विभागाचे डी वाय एस पी कुणाल सोनवणे एम एस ई बी चे राठेड साहेब, मिनिटरी स्टेशनचे कर्नल साहेब त्याचप्रमाणेशहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे तालुका पोलीस निरीक्षक विलास शेंडे नशिराबाद पोलिस स्टेशनचे एपीआय अनिल मोरे बाजारपेठ पोलिस स्टेशनचे एपीआय गणेश धुमाळ बाजारपेठ पोलीस उपनिरीक्षक शांताराम महाजन शहर पोलीस स्टेशनचे एपीआय गोसावी साहेब संदीप दुंनगह साहेब शहर वाहतुक निरोक्षक स्वप्नील नाईक एपीआय रूपाली चव्हाण शांताराम चौधरी तसेच नंदू किसन सोनवणे, सुनील सोनवणे श्री गायकवाड आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांची ही यावेळी सहकार्य .

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने