लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त अंकिता पाटील यांनी केले अभिवादन प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:  लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी आज लाखेवाडीत स्व.गोपीनाथजी मुंडे यांच्या  प्रतिमेचे  पूजन करून विनम्र अभिवादन केले.
   यावेळी अंकिता पाटील म्हणाल्या की, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे तीन पिढीचे कौटुंबिक ॠणाबंध आहेत आणि हा ॠणाबंध असाच कायमस्वरूपी राहिल. तसेच भविष्यात पकंजा मुंडे व प्रितम मुंडे आम्ही एकत्रित असेच काम करत राहू असे आश्वासन दिले.  
               या कार्यक्रमास तानाजीराव नाईक, आबासाहेब उगलमोगले, विष्णू जाधव,पंढरीनाथ थोरवे, रामचंद्र नाईक ,पांडुरंग नाईक,रवींद्र पानसरे, नागेश पानसरे, आपासो ढोले , बंटी जाधव, शिवाजी घोगरे,पांडूरंग माने , काशिनाथ अनपट, शिवाजी खाडे, तानाजी चव्हाण, कांतीलाल निंबाळकर, वामन निबाळकर, महेश निंबाळकर, पंढरीनाथ थोरवे, प्रकाश ढोले , बापूराव ढोले, अशोक उगलमोगले,योगेश सानप, स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचे सर्व युवक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने