पुणे: पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूरचे ग्रामदैवत तसेच सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत चाँदशाहवली दर्याच्या ४५७ व्या उरुसानिमित्त चाँदशाहवली बाबांचे दर्शन घेतले.
कोरोनाचे संकट दूर करण्याचे तसेच सर्वत्र सुख शांतीसाठीची प्रार्थना यावेळी जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी केली.
यावेळी नगरसेवक कैलास कदम,आझाद पठाण, शेरखान पठाण, महादेव चव्हाण, महामूद मुजावर, मुनीर मुजावर, हमीद आत्तार,सोहेल पठाण,निहाल पठाण उपस्थित होते.
Tags
news
