एमपीएससी ड्रग इंस्पेक्टर भरतीला स्थगिती या मागणीला यश अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पंकज चौधरी.




औषध निरीक्षक या पदासाठी काढलेल्या जाहिरातीला एमपीएससी आयोगाकडून स्थगिती देण्यात आली 
 17 नोव्हेंबर या दिवशी एमपीएससी आयोगामार्फत एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं होतं त्या जाहिराती मध्ये औषध निरीक्षक या पदाच्या 87 जागा जाहीर करण्यात आल्या होत्या  आणि त्यासोबत अनुभवाची अट पण होती  त्या अनुभवाच्या अटीमुळे आज हजारो विद्यार्थ्यांचे त्या परीक्षेपासून वंचित राहत होते. दिल्ली उच्च न्यायालय 2018 साली औषध निरीक्षक या पदासाठी घेतलेल्या परीक्षेसाठी निधी पांडे vs लोकसेवा आयोग या केस मध्ये CAT Drug & Cosmetic Act 1945 नियम 49 नुसार असं सांगण्यात आलं आहे की अनुभवाची अट ही नियुक्ती नंतर चालू होते म्हणून दिल्ली, मध्य प्रदेश राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू या सर्व राज्यांनी अनुभवाची अट कायमस्वरूपी रद्द केली . पण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अनुभवाची अट टाकल्यामुळे 95 टक्के विद्यार्थी वंचित राहत होते या सर्व फार्मासिस्टच्या विचार करून अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने गेल्या एक महिन्यात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन, संबंधित मंत्री महोदय यांना निवेदन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री  राज्यमंत्री आणि वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून  विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा असे सांगण्यात आले होते त्याच्या अनुषंगाने संबंधित मंत्री माननीय नामदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब व माननीय नामदार दत्तात्रय मामा भरणे साहेब याबाबत यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली व त्यांना त्याबद्दलची निवेदन पण देण्यात आले निवेदना मार्फत असे सांगण्यात आले की अनुभवाची अट कायमस्वरूपी रद्द करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष दत्ता मारोती खराटे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पंकज चौधरी प्रदेश सचिव रोहित वाघ  प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण  यांनी कायदेशीर पावले उचलण्यात आले  त्याच्या अनुषंगाने 11 डिसेंबर या रोजी  परिपत्रक काढून 17 नोव्हेंबरला काढलेल्या  जाहिरातीवर एमपीएससी आयोगाने स्थगिती दिली त्यामुळे राज्यातील फार्मासिस्टच्या हक्कासाठी लढणाऱ्या अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्फत मोठे यश प्राप्त झाल आहे आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये लवकरच एक्सपिरीयन्स निघून बी फार्म फ्रेशर्स विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल असं मत त्यांनी व्यक्त केला आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने