भुसावल- जळगाव येथील राजनंदनी संस्थेमार्फत अनेक विविध स्वरूपाचे पुरस्कार अल्पबचत भवन जळगाव येथे जेडीसीसी बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर आमदार चिमणराव पाटील पी. ई.तात्या पाटील तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत रघुनाथ आप्पा सोनवणे यांनी केलेल्या जीवनातील कार्य विविध सामाजिक उपक्रम राबवित अनेक सामाजिक संस्थांना मदतही करत असतात या त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले तर सुरेंद्र सिंग पाटील यांनी निसर्ग सामाजिक पर्यावरण क्षेत्रात केलेल्या भरीव कार्यामुळे त्यांना पर्यावरण मित्र पुरस्कार आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले रघुनाथ आप्पा सोनवणे व सुरेंद्रसिंग पाटील यांना मिळालेल्या पुरस्काराचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे तसेच रानमळा पॅटर्न चे प्रणेते पी टी शिंदे व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा शैक्षिक आगाज चे राज्य समन्वयक नाना पाटील गिरीश भंगाळे अजबसिंग पाटील राजेश पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले तसेच समाजातील अनेक मान्यवरांनीही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला
Tags
news
