खर्दे विद्यालयात जागतिक समानसंधी सप्ताह अंतर्गत विविध उपक्रम संपन्‍न




तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील आर. सी. पटेल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक समान संधी जनजागृती सप्ताहांतर्गत समावेशित शिक्षण सक्षमीकरण विभाग अंतर्गत केंद्र शासनाने अमंलात आणलेल्या अधिनियमान्वये विशेष गरजा असणाऱ्या बालकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता दिव्यांग प्रकारातील विशेष गरजा असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना समावेशीत शिक्षणाकडून समाजाच्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व बालकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विद्यालयात जनजागृती रॅली ,रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व दिव्यांग शिक्षक मुलाखत असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
   याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य  प्रदीप साळुंखे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती जाधव, पंचायत समिती विशेष शिक्षिका रोहिणी साळुंके , पी.बी. धायबर , ए.जे. पाटील, हितेंद्र देसले, अमोल सोनवणे, सुनिता सूर्यवंशी, सीमा जाधव, सुनंदा निकम, मनीषा पाटील, डी. एम. पवार पी. एस. अटकाळे, बी. एस.पावरा, वाय.डी. मिठभाकरे आदी उपस्थित होते .
   शाळेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील प्रथम दोन यशस्वी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे -

 *निबंध स्पर्धा* (लहान गट)-
1) अर्चना संतोष मराठे
2) मिस्तरी नावीन्य भास्कर

 *मोठा गट*
 1)पवार दर्शना नारायण
 2)चौधरी स्मिता रविंद्र

 *चित्रकला स्पर्धा* 
 चौधरी अनिता छोटू , 
पाटील दिनेश ज्ञानेश्वर

*रांगोळी स्पर्धा* 

 *लहान गट* 
1) गायकवाड भूमिका सुरेश 
2)बोरसे दर्शना अमृत

 *मोठा गट* 
1)पाटील सीमा भगवान 
2)पवार पूजा विनोद
तसेच  विद्यालयातील दिव्यांग शिक्षिका श्रीमती सुनंदा निकम यांची मुलाखत यावेळी घेण्यात  आली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने