खर्दे बु. विद्यालयात गुणवत्ता वाढीसाठी पालक- शिक्षक सहविचार सभा




   तालुक्यातील  खर्दे बु. येथील आर. सी. पटेल माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावी व बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी पालकांची सभा घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य पी. आर. साळुंखे उपस्थित होते.
  सुरुवातीला विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या सहविचार सभेत आतापर्यंत  गुणवत्ता वाढीसाठी हाती घेतलेले विविध उपक्रम यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
  विद्यालयाचे शिक्षक एच. एस. देसले, श्रीमती एम. एन .पाटील, पी. एस. अटकाळे यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे पटवून सांगितले . पालकांमधून रवींद्र दामू खोंडे, नितीन पाटील, उज्वला मराठे, ज्योती गुजर, प्रभा गुजर यांनी आपले विचार मांडले.
    शालेय परिसर स्वच्छ, सुंदर व बोलका पाहून तसेच विद्यार्थी गुणवत्तावाढीसाठी  शाळेने हाती घेतलेले विविध  उपक्रम व शालेय शिस्त  पाहून पालकांनी कौतुक केले. विद्यालयाचे प्राचार्य प्रदीप साळुंखे यांनी  शाळा विकासासाठी हाती घेतलेले विविध उपक्रम व विद्यार्थी गुणवता वाढीसाठी करीत असलेले प्रयत्न याबाबत सविस्तर विवेचन केले.
यावेळी खर्दे बु.,उंटावद व साकवद येथील पालक, प्राचार्य पी.आर .साळुंखे, पी.बी. धायबर, ए. जे. पाटील, अमोल सोनवणे, हितेंद्र देसले, डी. एम. पवार, बी .एस. बडगुजर, पी. एस. अटकळे, बी .एस. पावरा, सुनिता सूर्यवंशी, सीमा जाधव, सुनंदा निकम,निकिता पाटील,सुवर्णा पाटील, सचिन पवार व ललित कुलकर्णी, आदी उपस्थित होते.
  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख ए . जे. पाटील व आभार प्रदर्शन बी.एस. बडगुजर यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने