धुळे-नेहरू युवा केंद्र धुळे व युवा परिवर्तन फाऊंडेशन धावडे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने कॅच द रेन" अंतर्गत पाणी आडवा पाणी जिरवा कार्यक्रम




धुळे-नेहरू युवा केंद्र धुळे व युवा परिवर्तन फाऊंडेशन धावडे ह्यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा समन्वयक अशोककुमार मेघवाल व युवा परिवर्तन फाऊंडेशन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कढरे ता.साक्री  येथे "कॅच द रेन" अंतर्गत  पाणी आडवा पाणी जिरवा  कार्यक्रम राबवण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक अशोककुमार मेघवाल होते.*
*ह्यावेळी उपस्थित विद्यार्थी व गावातील सुजाण नागरिकांना पाणी आडवा,पाणी जिरवा किंवा पाण्याच्या वापराबाबत,पाणी बचत बाबत एक नवा संकल्प करून प्रतिज्ञा घेतली.*
*कार्यक्रमासाठी सर्व श्री वाघ,पाटील सर, खांडेकर,तसेच देवरे मॅडम आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनंजय ठाकरे, दिपाली पाटील,मोहन पाटील अक्षय पाटील व सर्व युवा परिवर्तन फाऊंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने