डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू उजवा हात कर्मवीर भाऊरावांचा नाशिक म.न.पा ला विसर..

 

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विश्वासू उजवा हात कर्मवीर भाऊरावांचा  नाशिक म.न.पा ला विसर..
भारतीय बहुजन सेनेच्या वतीने अभिवादन, महानगर पालिकेचा जाहीर निषेध,

29 डिसेंम्बर कर्मवीर, पद्मश्री दादासाहेब गायकवाडांचा स्मृतिदिन.  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विश्वासु सहकारी महाड चवदार तळे/काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह/मुक्तीभूमी येवला येथील धर्मांतर घोषणेच्या सभेचे सरसेनानी,नाशिकचे भूमिपुत्र दादासाहेब गायकवाड. नाशिक नगरपालिकेचे नगरसेवक, लोकल बोर्डाचे सदस्य, स्वतंत्र मजुर पक्षाचे आमदार, खासदार, बाबासाहेबांचा शब्द प्रामाण्य मानुन उभी ह्यात ज्यांनी समाजसेवरसाठी घालवली, खासदारकीला बाजूला सारत यशवंतराव चव्हाणांना केंद्रात खासदार म्हणुन पाठवत नाशिकचा सर्वांगीण विकास व्हावा ह्या उदात्त हेतुने HAL मिग विमानाचा कारखाना ओझर येथे आणला.मुखेडचा सत्याग्रह, उमराळे गावचा पाण्याचा सत्याग्रह, जगाच्या वेशीवर भूमिहीनांच्या व्यथा-कसेल त्याची जमीन नसेल त्याचे काय. असे ठणकावून सांगणारे दादासाहेब शासनाची झोप उडवून टाकत.
दादासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्र शासनाने अनेक घोषणा केल्या, त्यांच्या जीवनावर आधारित गौरवग्रंथ छापला, त्यांचे जन्मगाव दिंडोरी आंबे येथे स्मारक बांधले ते अजुन अपूर्णावसतेत आहे. दादासाहेबांच्या नावाने भूमीहीनांसाठी दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना आणली तीही कूर्मगतीने कार्यरत आहे.
 नाशिकचे धडाकेबाज माजी महापौर दशरथ पाटील यांच्या काळात भाभानगर नाशिक येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृह बांधले त्याची अवस्था बिकट आहे.
नाशिक मनपा चे आयुक्त कैलासजी जाधव साहेबांचा एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून नावलौकिक आहे. परंतु त्यांनाही वाटले नाही कि नेहरू गार्डन येथील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्या समोर त्यांच्या स्मृतींना उजाळा द्यावा.
 *भारतिय बहुजन सेनेचे प्रदेशाध्यक्ष भीमश्री विजयराज पगारे* डॉ भास्कर म्हरसाळे, हे आपल्या सहकार्या समवेत दादासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेले असता पुतळ्यावर अंधार पडला होता. मनपा ने कुठल्याही प्रकारची साफसफाई केली नव्हती. एव्हढ्या उतुंग व्यक्तिमत्वाचे दादासाहेब असतांना त्यांचा पुतळा फार लहान वाटतो अशी खंत व्यक्त करत आगामी काळात मनपाने दादासाहेबांचा भव्य पुतळा उभारावा व ओझर विमानतळाला दादासाहेब गायकवाड यांचे नाव दयावे अशी अपेक्षा व्यक्त करत दादासाहेबांना विनम्र अभिवादन केले.
  यावेळी विजयराज पगारे,अविनाश गायकवाड, भास्कर महरसाळे.  आदि उपस्थित होते

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने