थाळनेर येथे होमगार्ड संघटनेचा ७५ वा सप्ताह साजरा




थाळनेर (वार्ताहर) निष्काम सेवेचे व्रत घेतलेल्या होमगार्ड संघटना स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील होमगार्ड पथकाने स्वच्छता अभियान राबवून सप्ताह उत्साहात साजरा केला.


             मुंबई राज्याचे तत्कालीन गृहमंत्री मोरारजीभाई देसाई यांनी ६ डिसेंबर १९४६ रोजी प्रथम 'नगरसेना '(होमगार्ड) या नावाने एका नव्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांची संघटना स्थापन केली.सण,उत्सव,निवडणुका, मोर्चा,आंदोलन,संप,परीक्षा आदी काळात कायदा व सुव्यवस्था अबादित राखण्यासाठी पोलिस विभागाला गरजेच्या वेळेस सेवा देणाऱ्या होमगार्ड संघटना स्थापनेला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने थाळनेर होमगार्ड पथका कडून अमृत महोत्सवी वर्धापन दिवस साजरा करीत दि.६ डिसेंबर ते १३ डिसेंबर २०२१ पर्यंत या आठ दिवसाच्या कालावधीत थाळनेर पोलिस स्टेशन,ग्रामीण रुग्णालय,स्वामी समर्थ केंद्र, भुईकोट किल्ला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान यासह आदी ठिकाणी स्वच्छ्ता अभियान राबवून वर्धापन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.


       या स्वच्छता अभियानात थाळनेर पोलिस ठाण्याचे ए.पी.आय.उमेश बोरसे,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजपुत व कर्मचारी यांनी मोठा सहभाग घेतला.होमगार्ड संघटनेचा वर्धापन दिवस साजरा करीत असताना राबविलेल्या स्वच्छता अभियानात पथकाचे समादेशक निंबा पाटील,शालीग्राम माळी,दिनेश मराठे,प्रदिप मराठे,संजय सावळे, गोपाल जाधव,छोटू पाटील,बापू शिरसाठ,सुनिल वाघ,विजय वाघ,रविंद्र पाटील,सुनिल चौधरी,हेमराज राजपुत, सतिष राजपुत, नीळकंठ मराठे,भास्कर शिंपी,विकास बिऱ्हाडे,सुकदेव कोळी,रणसिंग बंजारा,रामकृष्ण निकम,महिला होमगार्ड मंगला मराठे, मिनाक्षी भोई,उषा धनगर,रूपलक्ष्मी जाधव यांच्यासह आदी होमगार्ड जवानांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने