पुणे:रांची (झारखंड) येथे पार पडलेल्या १५ वर्षाखालील फ्री स्टाईल कुस्ती स्पर्धेत अहिल्या शत्रुघ्न शिंदे (शिरसोडी) हिने सुवर्ण पदक पटकावले असून तिचे कौतुक व अभिनंदन राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील, जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील आणि निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी केले.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' इंदापूर तालुका हा क्रीडा क्षेत्रासाठी उल्लेखनीय कामगिरी करणारा तालुका असून अहिल्या शिंदे हिने उत्कृष्ट कामगिरी करत स्वर्ण पदक मिळवले असून इंदापूर तालुक्यासाठी ही आनंदाची बाब आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे मनापासून अभिनंदन.'
Tags
news
