*पर्यावरण संवर्धन चित्रभरण स्पर्धेत भारतात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक*
*अहिल्यादेवी कन्या विद्यालयाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक*
भुसावळ - शहरातील मुलीसाठी स्वंतत्र एकमेव सुप्रसिद्ध असलेली अहिल्यादेवी कन्या विद्यालय तील विद्यार्थिनींनी *रेडिओ मेरी आवाज* *लिटील हेल्प भारत* तसेच *शैक्षिक आगाज* या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत आयोजित पर्यावरण संवर्धन चित्र काढून ते चित्र दिलेल्या गुगल फॉर्म वरती अपलोड करून माहिती भरावी अशी स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती .या स्पर्धेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी पर्यवेक्षक संजीव पाटील जेष्ठ्य शिक्षक राज्य समन्वयक नाना पाटील चित्रकला विभागाचे शिक्षक श्रीकांत कांनगो त्याचबरोबर इतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना या स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले स्पर्धेत अहिल्यादेवी कन्या विद्यालयातील पाचवी ते दहावी च्या वर्गातील 380 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पद्मश्री प्राप्त पर्यावरण तज्ञ कल्याण सिंग रावत उत्तराखंड तसेच संजय जैन सेक्रेटरी कला संस्कृत भाषा विभाग दिल्ली सरकार ,समृद्धी चौधरी संस्थापक लिटील हेल्प ट्रस्ट भारत, यांच्या सहिते प्रमाणपत्र प्राप्त केले महाराष्ट्रातून 490 स्पर्धका पैकी एकट्या अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ येथील 380 स्पर्धक होते संपूर्ण भारतातून संपूर्ण भारतातून 2850 स्पर्धक सहभागी झाले होते या दिल्ली त्यानंतर महाराष्ट्रातील सर्वात जास्त स्पर्धा सहभागी होते या सर्व सहभागी विद्यार्थी आणि त्यांना प्रोत्साहित करणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले .
यासाठी राज्य समन्वयक नाना पाटील भुसावळ शैक्षिक आगाज च्या संचालिका स्मृती चौधरी उत्तर प्रदेश , सत्यनारायण सोनी राजस्थान, रेडिओ मेरी आवाज चे अमित चौधरी ओमान ,समृद्धी चौधरी संचालिका लिटील हेल्प भारत याचे मार्गदर्शन लाभले
Tags
news
