श्री क्षेत्र नागेश्‍वर सेवा संस्थान येथे श्री दत्त मंदिरात महाप्रसाद व दर्शनाचा कार्यक्रम





शिरपूर : श्री क्षेत्र नागेश्‍वर सेवा संस्थान, नागेश्वर अजनाड बंगला येथे श्री दत्त मंदिरात महाप्रसाद , भजन संगीत व दर्शनाचा कार्यक्रम दि. १८ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.

श्री नागेश्वर सेवा संस्थानचे अध्यक्ष तथा शिरपूर-वरवाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई रसिकलाल पटेल यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नागेश्वर देवस्थान येथे श्री दत्त प्रभू यांच्या मूर्तीची देखील प्राणप्रतिष्ठा केली आहे. श्री दत्त जयंती निमित्ताने दि 18 डिसेंबर शनिवार रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन तसेच सकाळी 10 ते 12 या वेळेत वारकरी संगीत भजन महाआरती व पूजा दुपारी 12 वाजता व दर्शनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.



श्रीक्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम खूपच मोठ्या प्रमाणात केले असून या ठिकाणी नव्याने श्री गणपती मंदिर, पार्वतीमाता, श्री शंभू महादेवाचे मंदिर, श्री गुरुदत्त, श्री ऋषि महाराज, श्री हनुमंत, मोती माता मंदिर भव्य दिव्य स्वरूपात निर्माण करण्यात आले आहे.

श्री नागेश्वर मंदिराच्या पायथ्याशी सुरुवातीलाच गोमुख दर्शन होते. याठिकाणी महत्त्वाचे म्हणजे कालसर्प पूजा, नागबली पूजा सुद्धा कमीतकमी खर्चात केली जाऊ शकते. कारण, आवश्यक अशा सर्व धार्मिक सोयी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येथे उंबर, महादेव मंदिर, पाणी, गोमुख, अमर धाम, गोशाळा अशा सर्व बाबींची उपलब्धता नागेश्वर येथे झाली आहे. येथील श्री ऋषी महाराज मंदिर हे उत्तर महाराष्ट्रात एकमेव व सुंदर पर्यटन स्थळी उभारण्यात आले आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून भाविक श्री दत्तप्रभू यांच्या दर्शनाच्या या ठिकाणी लाभ घेऊ शकतात, असे श्री नागेश्वर सेवा संस्थान अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी कळविले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने