शिरपूर / सध्या शासनस्तरावरून जनतेला दिलासा मिळावा मिळावा म्हणून आपल्या महत्वकांक्षी योजना शासन आपल्या दारी या संकल्पनेतून पूर्णत्वास आणले जात आहेत .त्याचाच एक भाग म्हणून काल शिरपूर तालुक्यातील कुरखळी या गावात सदरचा उपक्रम राबविण्यात आला .
ग्रामीण भागातील जनतेला एकाच छताखाली शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शासन आपल्या दारी उपक्रम तालुक्यात राबविण्यात येत आहे. दिनांक 15 रोजी सकाळी तालुक्यातील कुरखेडा येथे मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत दोन बालकांना धनादेश देण्यात आले. शासनाने ग्रामीण भागातील जनतेसाठी सदरचा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमात मधून शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी लाभार्थ्यांना मिळावा म्हणून तहसीलदार आबा महाजन यांनी कुरखळी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते .
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आ. काशीराम पावरा ,अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदाळे ,शहर बालविकास प्रकल्प अधिकारी पगारे, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा परिषदेच्या बालविकास महिला कल्याण सभापती सौ धरती देवरे, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, बाल विकास प्रकल्प अधिकारी शिंदे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
कोरोना काळात ज्या पालकांनी पालक गमावले व पती गमावला त्यांच्यासाठी शासनाने मिशन वात्सल्य योजना हाती घेतली असून कुरखळी येथे मान्यवरांच्या हस्ते पालक गमावलेल्या दोन बालकांना अर्थसहाय्य म्हणून धनादेश देण्यात आला. तसेच अन्य योजनांचा लाभ उपस्थित महिलांना देण्यात आला. सदरच्या उपक्रमांमुळे व शासनाच्या मदतीमुळे लाभार्थ्यांनी शासनाचे अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
Tags
news



