सिकलसेल सप्ताह अंतर्गत निमझरी येथे आश्रमशाळेत सिकलसेल विषयी मार्गदर्शन व तपासणी कार्यक्रम संपन्न




शिरपूर : तालुक्यातील निमझरी येथे आर. सी. पटेल आश्रमशाळेत दि. १४ डिसेंबर २०२१ रोजी सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत देशभरात सुरु असलेल्या ११ ते १७ डिसेंबर २०२१ या सिकलसेल सप्ताह मध्ये उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील डॉ. ऋषिराज महाजन (सिकलसेल कौन्सिलर), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पंकज चव्हाण, अजय माळी व सहकारी कर्मचारी यांचे पथक आले होते. या पथकातील डॉ. ऋषिराज महाजन यांनी सर्वप्रथम सिकलसेल आजार म्हणजे काय?, याची लक्षणे कोणती? याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो? हा आजार एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत असतो. कुटुंबातील आई किंवा वडील सिकलसेल ग्रस्त असतील किंवा वाहक असल्यास त्यांच्याकडून येणाऱ्या पिढीत हा आजार होण्याचा संभव असल्याने हा अनुवांशिक आजार आहे. यामुळे या आजाराचे निदान होण्यासाठी रक्ताची तपासणी करणे गरजेचे असते हे समजावून दिले. सिकलसेल आजाराचे ३ प्रकारांची देखील माहिती दिली. सिकलसेल ग्रस्त व्यक्तींसाठी असलेल्या शासकीय सुविधा यांचीही माहिती देण्यात आली. त्यानंतर प्राथमिक मुख्याध्यापक पी. एन. लोहार यांनी विद्यार्थ्यांना सिकलसेल बद्दल मनात भीती न बाळगता रक्ताची तपासणी करून सिकलसेल चे निदान सकारात्मक आल्यास सरकारी दवाखान्यातून केला जाणारा औषधोपचार व्यवस्थित पणे घेतल्यास नियंत्रण मिळवता येते, असे मत मांडले. माध्यमिक मुख्याध्यापक पी. डी. पावरा यांनी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेत २० मिनिटांचा जादा वेळ देखील मिळत असतो याचबरोबर इतर शासकीय सुविधा देखील मिळत असल्याचे सांगितले. या मार्गदर्शन व तपासणी शिबिरात इयत्ता ५ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांची रक्ताची चाचणी करून सिकलसेलचे अहवाल घेण्यात आले.




Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने