माहिती व जनसंपर्क भवनाचा प्रयोग राज्यासाठी अनुकरणीय महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे : भवनाची केली पाहणी



धुळे, दि. 15 (जिमाका वृत्तसेवा) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मंत्रालय, मुंबईच्या अधिनस्थ जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय, धुळेची नवीन इमारत असलेल्या माहिती व जनसंपर्क भवनास  महासंचालनालयाचे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज दुपारी भेट देवून पाहणी केली. त्यांनी माहिती व जनसंपर्क भवनाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. तसेच हा प्रयोग राज्यासाठी अनुकरणीय ठरेल, असे सांगितले.  


नाशिक विभागाचे माहिती उपसंचालक ज्ञानेश्वर इगवे, जळगावचे जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके आदी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजनेतून धुळे येथे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक आणि धुळे जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिल्या माहिती व जनसंपर्क भवनाची इमारत साकारली आहे.  महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी माहिती व जनसंपर्क भवनाची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचा राज्यातील पहिला प्रयोग असून तो अनुकरणीय आहे. या भवनाच्या माध्यमातून  शासन आणि माध्यमांमधील संवाद वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त केला.


माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा सत्कार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना माहिती कार्यालयाचे कामकाज सुरू होते. या कामगिरीची दखल घेत महासंचालक डॉ. पांढरपट्टे यांनी जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, उपसंचालक श्री. इगवे, जिल्हा माहिती अधिकारी श्री. चिलवंत, श्री. बोडके, माहिती सहाय्यक गोपाळ साळुंखे, संदीप गावित आदी उपस्थित होते. महासंचालक डॉ. पांढरपट्टे, अपर जिल्हाधिकारी श्री. जगदाळे, माहिती उपसंचालक श्री. इगवे यांनी मार्गदर्शन केले.  जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांनी प्रास्ताविक केले. माहिती सहाय्यक श्री. साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले, तर श्री. गावित यांनी आभार मानले. माहिती कार्यालयातील दूरमुद्रक चालक बंडू चौरे, लिपिक चैतन्य मोरे, सर्वसाधारण सहाय्यक इस्माईल मणियार, संदेश वाहक अरुण ओगले, चंद्रकांत अहिरे आदींनी संयोजन केले.



Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने