मालपुर वार्ताहर - दि.7/12/2021रोजी मालपुर येथील दिव्यांग भगीनी श्रीमती लताबाई कोळी यांना वाल्या सेना गृप खान्देश च्या कार्यकर्त्यांनी सौ गीतांजली कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली वर्गणी गोळा करून सायकल रिक्षा उपलब्ध करून दिली...आदीवासी टोकरे कोळी जमातीच्या दिव्यांग भगीनी लताबाई यांनी सक्षम व्हावे यासाठी वाल्या सेना चे सुरत येथील कार्यकर्ते श्री ईश्वर कोळी यांनी लताबाई यांना स्वयं रोजगार साठी मदत केली त्यातून आज त्यांना छोटाश्या भांडवलातून उदरनिर्वाहासाठी मालपुर येथे बोमिल, झिंगे याचा फिरता छोटासा व्यवसाय टाकून प्रोत्साहन देण्यात आले वाल्या सेना च्या मार्गदर्शक तसेच सामाजिक कार्यकर्ता सौ गीतांजली कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या उपक्रमात ईश्वर कोळी, गोपाल कोळी, उमेश कोळी, संजय कोळी, विकास कोळी, अश्वीनी कोळी, विजय कोळी, तसेच मालपुर गावातील कार्यकर्ते उपलब्ध होते....
वाल्या सेना गृप खान्देश च्या या स्तुत्य कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे...
Tags
news
