महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने त्यांच्या परिपत्रककातून 17 नोव्हेंबर 2021 या दिवशी 87 औषध निरीक्षक ( drug inspector) या पदाच्या जागा जाहीर करण्यात आल्या, त्यासोबत तीन वर्षाचा अनुभव अट टाकण्यात आली. या होणारा परीक्षेसाठी महाराष्ट्र मध्ये जी अनुभवाची अट आहे ती कायमस्वरूपी काढायला पाहिजे,या संदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाने 2018 साली ड्रग इन्स्पेक्टर या पदासाठी परीक्षा घेतली होती तेव्हा
निधी पांडे विरुद्ध संघ लोकसेवा आयोग केस मध्ये CAT ने ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1945 च्या नियम 49 नुसार असे संगितले की अनुभवाची अट नियुक्ती नंतर लागू होते कारण त्या अनुभवाच्या अटीमुळे . 95 टक्के विद्यार्थी पेपर ला औषध निरीक्षक या पदासाठी होणाऱ्या एक्झाम साठी पात्र होऊ शकत नाहीत, तसा विचार केला तर बाकीच्या राज्यांमध्ये बी फार्मसी झाल्यानंतर ड्रग इंस्पेक्टर चे एक्झाम देता येते उदाहरणात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश, दिल्ली, तामिळनाडू या राज्यांमध्ये अनुभवाची अट नाही . महाराष्ट्र मध्ये सध्या सध्याच्या परिस्थितीला औषध निरीक्षक यांच्या 87 जागा निघाले आहेत त्या जागेसाठी विद्यार्थ्यांकडे अनुभव नसल्यामुळे 90 टक्के विद्यार्थी परीक्षेला मुकणार असे चित्र दिसून येते . त्याच्या अनुशंगाने 11 डिसेंबर या रोजी औषध निरीक्षक या पदावर होणाऱ्या परीक्षेसाठी तात्पुरती स्थगिती आलेली आहे. स्थगिती सोबत अनुभवाची अट कायमस्वरूपी रद्द करावी यासाठी मुंबई विभाग कार्याध्यक्ष व राज्य कार्यकारणी सदस्य हर्षराज अहिरे सर यांच्या कसबा विधानसभा अध्यक्ष नीताताई समीर पालवे यांच्या सहकाऱ्यांनी व मार्गदर्शक प्रदेशाध्यक्ष दत्ता मारोती खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर पंकज चौधरी, प्रदेश सचिव रोहित वाघ, प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण आणि राज्य कार्यकारिणी सदस्य हर्षराज अहिरे यांच्या मार्गदर्शनाने केसरी बाग पुणे येथे दिनांक 16/12/2021माननीय श्री राज साहेब ठाकरे (मनसे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य) यांना संदीप लहाने पिंपरी चिंचवड अध्यक्ष ( अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य) यांच्या माध्यमातून औषध निरीक्षक पदासाठी असलेल्या अनुभवाची अट कायमस्वरूपी रद्द करून विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा यासाठी निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यावेळेस माननीय राज साहेब ठाकरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष ) यांचा सकारात्मक रिस्पॉन्स मिळाला, येणारे एक दोन तीन दिवसात राज साहेबांच्या मार्फत आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे . त्यामुळे सध्याचे अन्न औषध प्रशासनाचे मंत्री असलेले डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि दत्तात्रय मामा भरणे राज्यमंत्री या संबंधित मंत्र्याकडे माननीय राज साहेब मार्फत पाठपुरावा होऊन लवकरच विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय होईल असा विश्वास राज साहेब ठाकरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष )यांनी दिला आहे.
Tags
news


