स्व.मारुतीराव चोपडे कुटुंबियांचे राजवर्धन पाटील यांचेकडून सांत्वन प्रतिनिधी दत्ता पारेकर




       पुणे:श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष स्व. मारुतीराव चोपडे (भाऊ) यांच्या कुटुंबीयांचे ढेकळवाडी येथे निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी भेट घेऊन  सांत्वन केले. 
           भवानीनगर येथील छत्रपती साखर कारखान्याचे प्रदीर्घकाळ संचालक असलेले मारुतराव चोपडे यांचे नुकतेच वृद्धपकाळाने  निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वन भेटीत राजवर्धन पाटील यांनी चोपडेभाऊ यांचेशी कर्मयोगी शंकररावजी पाटील, स्व. राजेंद्रकुमार घोलपसाहेब तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या जिव्हाळ्याच्या संबंधांना उजाळा दिला. स्व. मारुतीराव चोपडे भाऊ जाण्याने सहकार चळवळ तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक हरपल्याची भावना या भेटीत राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी राजेंद्र चोपडे, विनोद चोपडे व चोपडे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने