पंचवटी विभागात घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दंडात्मक कारवाई. नाशिक शांताराम दुनबळे



   नाशिक=  नाशिक शहर पंचवटी विभागात घनकचरा व्यवस्थापन विभाग कडुन विवाह सोहळ्यात तसेच इतरत्र विना मास्क फिरणाऱे व कामकाज करणारे,सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणारे व्यक्तींवर महानगर पालिकेच्या  पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत  आज (दि.९ डिसेंबर २०२१) रोजी दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान एकुण एकविस हजार चारशे रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. 

        महाराष्ट्र कोविड-१९ उपाय योजना साथरोग अधिनियम १८९७,व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ३०,३३,३४,४१ व ५१ चे तरतुदीनुसार  दि ९/१२/२०२१ रोजी मनपा आयुक्त मा.कैलास जाधव यांचे आदेशाने व घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ आवेश पलोड़ यांचे मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागीय अधिकारी महेंद्रकुमार पगारे,पंचवटी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे यांच्या उपस्थित पंचवटी विभागातील पथकासोबत विविध ठिकाणी पाहणी करुण  विनामास्क  फिरणाऱ्या, कामकाज करणाऱ्या *४२* व्यक्तींना  प्रत्येकी ५०० याप्रमाणे एकूण रक्कम  *२१०००* रूपये दंड करण्यात आला. तर सार्वजनिक ठिकाणी अस्वछता र रु ४०० दंड करण्यात आला आहे. 

एकूण दंड र रु *२१४००*

        या मोहिमेत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे स्वछता निरीक्षक डी.बी.मालेकर,विनय रेवर,दीपक चव्हाण,किरण मारू,उदय वसावे,आदी उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने