शिरपूरात भाजपाने साजरा केला सुशासन दिन माजी पंतप्रधान स्व. वाजपेयी यांच्या जयंती निमित्त आ. काशिराम पावरा, प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते प्रतिमा पुजन

 



 शिरपूर : माजी पंतप्रधान, भारतरत्न श्रद्धेय स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सुशासन दिवस अंतर्गत शिरपूर भाजपाच्या वतीने येथील करवंद रोड वरील आमदार संपर्क कार्यालयात आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रतिमेस मार्ल्यापण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर तालुकाध्यक्ष किशोर माळी, बाराबलुतेदार महासंघ उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष एकनाथराव बोरसे, भाजपा अल्पसंख्यक मोर्चा जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, बाराबलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज बोरसे, शहराध्यक्ष प्रकाश गुरव, गजानन चौधरी, काशिनाथ चौधरी, गुलाब चौधरी आदि पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते. याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले की, स्व. अटलबिहारी वाजपेयी हे उत्तुंग व्यक्तिमत्व, प्रेरणास्थान होते त्यांनी भाजपाच्या लाखो कार्यकर्त्यांना सदैव प्रेरित करण्यासोबतच देशाला सुशासनाची एक नवीन परिभाषा शिकवली. देशाच्या जडघडणीत त्यांचे फार मोठे योगदान आहे. निर्णय क्षमता, सकारात्मक दृष्टिकोन, निर्भीड आणि कर्तुत्ववान कार्यशैलीमुळे इतिहासात त्यांचे नाव सदैव स्मरणात राहील असे सांगितले. तर आ. काशिराम पावरा म्हणाले की, भारताच्या विकासाला नवे आयाम देणारे देशाचे माजी पंतप्रधान, अबाल वृद्धांचे प्रेरणास्थान, जननायक भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी म्हणजे विकासाची दूरदृष्टी, कुशल संघटन कौशल्य, सर्व समावेशक नेतृत्वगुण, निस्सीम देशप्रेम, निस्वार्थी सेवाभाव, उच्चकोटीची काव्यप्रतिभा व प्रभावी वक्तृत्वशैली लाभलेले सरळमार्गी राजकीय व्यक्तिमत्व होते. त्यांनी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून गावोगावी पायाभूत सुविधा विकसित करून खेड्यापाड्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले तर सर्व शिक्षा अभियान राबवून ज्ञानगंगा गोरगरिबांच्या दारापर्यंत नेली. जनहितांच्या अनेक कामांच्या, भाषणांच्या व कवितांच्या माध्यमातून श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी हे अजरामर आहेत त्यांच्या पावन स्मृती आठवणी आम्हाला प्रेरणा देतात असल्याचे म्हटले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने