भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव निमित्त कळंबु ता.शहादा येथील डी. जी.बी.विद्यालयात कळंबु,कोठली,कुकावल,बोराळे व मातकुट येथील पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थिनीना युवकमित्र परिवार कोठली या संस्थेमार्फत मोफत १०० सायकलीचे वाटप करण्यात आले.यावेळी अध्यक्षस्थानी कळंबु विद्यालयाचे अध्यक्ष विजयराव बोरसे तर उदघाटक म्हणून सारंगखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, शाळेचे सचिव दत्तात्रय मोरे,माजी विद्यार्थी तथा धुळे येथील उद्योजक शत्रुघ्न बोरसे,युवकमित्र परिवाराचे प्रवीण महाजन,विद्यालयाचे मुख्यध्यापक मधुसूदन चौधरी,कुकावलचे सरपंच प्रतिनिधी जयवंत नेरपगार, बोराळेचे सरपंच अविनाश भिल,कळंबुचे माजी सरपंच प्रवीण वाघ,संतोष माळी,पत्रकार पुरुषोत्तम आगळे यांच्यासह विद्यार्थी व शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकमित्र परिवार ही संस्था पुणे,मुंबई शहरात जुन्या,दान केलेल्या सायकली संकलित करून दुरुस्त करते व ग्रामीण भागातील लांब दूरवर असलेल्या शाळांना मोफत सायकल वितरित करते. सायकल बँक उपक्रमांतर्गत यावेळी १०० सायकल दुरुस्ती करण्यासाठी कळंबु विद्यालय माजी विद्यार्थी ग्रुपने आर्थिक मदत केल्याचे यावेळी प्रवीण महाजन यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी स्वकष्टाने अभ्यास करत एक चांगला नागरिक बनून वंचितांची सेवा करण्याचे आवाहन यावेळी पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी केले.सूत्रसंचालन भूषण गवळे यांनी केले राजेंद्र कोंटूरवार यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
सायकल दुरुस्तीसाठी माजी विद्यार्थी व्हाट्ससप ग्रुपचे दातृत्व
- सायकल दुरुस्त करण्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत अर्थीक देणगी गोळा केली व तब्बल ४७ हजार निधी जमा केला.यामध्ये जळगाव जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, प्रकल्प अधिकारी आर आर पाटील,शत्रुघ्न बोरसे,राजेंद्र बोरसे, बँकेचे निवृत्त अधिकारी संतोष बागले,डॉ.विजेंद्र पाटील,डॉ.निलेश पवार,जी आर मंडळे,देविदास शिंदे,मधुसूदन चौधरी यासह अनेक विद्यार्थ्यांनी एकत्र येत मदतनिधी उपलब्ध करून दिला.
Tags
news
