होळ ग्रामपंचायत कारभारात त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप ग्रामपंचायत कारभारात अघोषित आबागिरी महेंद्रसिंग राजपूत शिरपूर


शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत होळ च्या कारभारात त्रयस्थ व्यक्तीच्या मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप असून लोकनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्य आणि शासन प्रतिनिधी ग्रामसेवक हे फक्त नामधारी राहिले असून ग्रामपंचायतीच्या कारभारात त्रयस्थ व्यक्तीच कामधारी म्हणून काम पाहत आहे का? असे विचारण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.


 यापूर्वी राजकारणात तालुक्यातील लोकांनी दादागिरी ,भाईगिरी, चमचेगिरी, गुलामगिरी पाहिली होती मात्र आता ग्रामपंचायतीच्या निमित्ताने होळ ग्रामवासी यांना व तालुक्याला नवीन आबागिरी पाहण्याची वेळ आली आहे. होळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर आबागिरी चे प्रस्थ असून सर्व ग्रामपंचायतचा कारभार अप्रत्यक्षरीत्या त्रयस्थ व्यक्ती कडून चालवला जात आहे असे आरोप होत आहेत. यात ज्यांना लोकांनी निवडून दिले ज्यांना संविधानिक अधिकार आहेत त्यांनी आपले अधिकार गहाण ठेवले आहेत व ज्यांच्या ग्रामपंचायत कारभाराशी कवडीच्या संबंध नाही अशा लोकांनी ग्रामपंचायत ची सूत्र बेकायदेशीरपणे आपल्या हाती ठेवून विनाकारण कारभारात ढवळाढवळ करत ग्रामपंचायत कामकाजाची सूत्र आपल्या हाती ठेवले आहेत अशी परिस्थिती दिसून येत आहे.आणि याच त्रयस्थ व्यक्तीकडून सरपंच व ग्रामसेवक यांना आदेश प्राप्त होतात का ? व ते देखील त्याचप्रमाणे कामे करतात का ? याच्या प्रत्येय आता नागरिकांना येऊ लागला आहे. एखाद्या ग्रामपंचायत मध्ये पॅनल उभे करणे हा एक वेगळ्या राजकीय भाग झाला मात्र आपण स्वतः कोणत्याही ग्रामपंचायत पदावर नसताना ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करणे बेकायदेशीर असून शासन निर्णय 17 जुलै 2007 अन्वये  बेकायदेशीर कृत्य आहे. शासन परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीवर निवडून आलेल्या सदस्यांच्या पती-पत्नी मुलगा अथवा कोणत्याही नातेवाईक ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करू शकत नाही . जर कोणाचे नातेवाईक असे करत असतील तर त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते असा नियम असताना सर्व नियम नियमांना तिलांजली देत स्वतःला उच्चशिक्षित समजणाऱ्या जनतेला उपदेशाचे डोस पाजणार्‍या व्यक्तींकडूनच नियमांची पायमल्ली होत आहे .वारंवार होणाऱ्या मासिक मिटिंग मध्ये व ग्रामसभेमध्ये स्वतःकडेच सभेचे अध्यक्षपद ठेवायचे आणि मी च्या ग्रामपंचायतीचा मालक आहे या अविर्भावात ग्रामपंचायत कामकाजाचे व विकास कामांचे लेखाजोखा मांडला जातो. काही अपरिहार्य कारणास्तव एखाद दोन वेळेस बाहेरील व्यक्तीस अध्यक्षपद देणे काही गैर नाही मात्र वारंवार त्याची पुनरावृत्ती करणे हे बेकायदेशीर आहे. आणि यावेळेस निवडून आलेले प्रतिनिधी व ग्रामसेवक हे बघ्याची भूमिका घेतात व या गोष्टीला कोणताही विरोध करत नाहीत त्यामुळे सरळपणे त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप ग्रामपंचायत कारभारात होत असताना सरपंच व उपसरपंच यांना व ग्रामसेवकांना याबद्दल कोणतीही हरकत नसावी याबाबत नवल वाटण्यासारखे आहे. ग्रामसभेमध्ये अध्यक्षपद भूषवित असताना  ग्रामपंचायतीच्या गैर कारभाराविरोधात आवाज उठवणाऱ्या तरुणांना धमकीवजा इशारा देखील दिला जातो हे या ग्रामपंचायतीसाठी व लोकशाहीसाठी घातक आहे त्यामुळे लोकप्रतिनिधींनी देखील आपली कुवत आणि आपली जबाबदारी याची जाणीव ठेवत राजकारण केले पाहिजे. जिल्हा परिषद व पंचायत समिती मध्ये ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तस्तक्षेप करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी सक्षम कायदे असून सर्व बाबी निदर्शनास येऊन देखील अकार्यक्षम ग्रामसेवक मुळेच अशा व्यक्तींना चालना मिळत असून याबाबत खुद्द ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन प्रशासनाला तक्रार करणे गरजेचे आहे. मात्र आपल्या जिल्ह्यातील निष्क्रिय जिल्हा परिषद अधिकारी व पंचायत समितीतील कामचुकार विकाऊ अधिकाऱ्यांमुळे अशा लोकप्रतिनिधींना वाव मिळत असून अधिकारी त्यावर बोलायला किंवा कारवाई करायला तयार नाहीत. या उलट ते अशा राजकीय पदाधिकाऱ्यांची हुजरेगिरी करतात.



होळ ग्रामपंचायत मध्ये भरतो त्र्ययस्थानचा राजदरबार

ग्रामपंचायतीवर जानेवारी 2020 पासून नवीन सरपंच उपसरपंच व सदस्यांची निवड झाल्यानंतर स्वायत्त पणे ग्रामपंचायतचा कारभार लोकनियुक्त प्रतिनिधींना करू देणे अगत्याचे असताना त्यांच्या अधिकारावर गदा आणून बाहेरील व्यक्ती अघोषितआबा गिरी करत आबागिरी कारभार नियंत्रित करत आहे . यासाठी सरपंचांच्या नावाने एक स्वतंत्र  ए सी सुसज्ज व आराम दायक  दालन तयार करण्यात आले असून ग्रामपंचायत कामकाजाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी येथे  त्रयस्थ व्यक्तींच्या राजदरबार भरत असतो आणि रात्री उशिरापर्यंत याच ठिकाणी बसून राजकारणाचे आखाडे रंगवली जातात व गावाच्या राजकारणाची दशा आणि दिशा ठरवली जाते.असा गावकरी उघळ पणे बोलतात मात्र दुर्भाग्य हेच की यात कोणत्याही लोकनिर्वाचित सदस्याच्या सहभाग नसतो. म्हणून या ग्रामपंचायतीचे लोक निर्वाचित सदस्य हे नामधारी असून आबा गिरी करून ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करणारा व्यक्तीच  कामधारी आहे असे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे किमान यापुढे तरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या हॉल येथील बैठक व्यवस्थेचा वापर रिकामटेकड्या लोकांकडून होणार नाही याची दक्षता घेण्याची व आपले अधिकार साबुत ठेवण्याची जबाबदारी लोकनिर्वाचित सदस्यांवर सरपंच व उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यावर आहे. शासन प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवकांनी देखील अशा बेकायदेशीर कृत्यांना कायदेशीररित्या प्रतिरोध करणे गरजेचे आहे अन्यथा अशा बेकायदेशीर बाबी आपली खुर्ची कधी हालवतील  हे सांगता येत नाही.

होळ ग्रामपंचायतीचा मागील काळातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर

याआधी होळ ग्रामपंचायतीच्या कारभारावर अनेक प्रकारचे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले असून ग्रामपंचायत  गैरकारभाराचे सार्वजनिक वाभाडे निघत आहेत. यापूर्वी गावात झालेले बेकायदेशीर व्यापारी गाळे, त्यांच्यावर काही समर्थकांच्या असलेला बेकायदेशीर कब्जा, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी घरकुलांच्या नावाने बळकावलेली शासकीय जमीन, राजकीय स्वार्थासाठी इलेक्शन फंडिंग घेऊन व्यापाराच्या नावाने धनदांडग्यांना दिलेली ग्रामपंचायत ची कराराच्या नावाने घशात घातलेली जागा व गरजू बेवारस लोकांना घरकुल बांधण्यासाठी करण्यात आलेला विरोध , राजकारणातील स्वार्थ साधण्यासाठी लोकांना मूर्ख बनवून त्यांच्याकडून मतांचे दान मिळवून घेतले मात्र त्यांना देण्यात आलेल्या जागा याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई व हालचाल न करता त्यांची दिशाभूल करून राजकीय स्वार्थ साधला गेला त्यामुळे अशा विकासकामांना कायद्याची गदा येऊन ती कामे थांबण्याच्या मार्गावर आहेत. अशा अनेक  विषयांवर न बोलता कायद्याची भाषां करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी गैर कारभाराविरोधात बोलणाऱ्या युवकांना कायदा शिकवू नये हीच अपेक्षा. गावात नव्याने सुरू असलेल्या रस्ता कामासाठी लोकांचे अतिक्रमण काढले मग ग्रामपंचायत ला लागून असलेले व बेकायदेशीर शॉपिंग वर कब्जा करणाऱ्या लोकांचे अतिक्रमण काढण्यास आपल्याला कोणत्या नियमाने मनाई केली आहे. राजरोसपणे ग्रामपंचायत मालकीच्या वास्तु समर्थकांच्या घशात घालून त्यांना फुकटात वापर करण्यासाठी दिल्या जातात आणि याबाबत जाब विचारणाऱ्या तरुणांना भर सभेत दादागिरी करून प्रश्न विचारणे पासून वंचित करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून कर नाही त्याला डर काय हिम्मत असेल तर सर्वच गैरकारभारावर कायदेशीर हातोडा चालवा उगीच राजकीय समर्थकांचे गैरकृत्य झाकण्यासाठी कायद्याचे बालकडू दुसऱ्यांना पाजू नका , आणि थोडी जरी नीतिमत्ता शिल्लक असेल तर ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप करणे बंद करा अन्यथा या विरोधात कायदेशीर आक्षेप घ्यावा लागेल अशी भावना येथील तरुणांनी व्यक्त केली आहे.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने