शिरपूर - मा.पोलीस अधिक्षक श्री. प्रविणकुमार पाटील यांचे संकल्पनेतून व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री प्रशांत बच्छाव, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल माने यांचे मार्गदर्शनातून शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथील पोलीसांचे कामाचा दर्जा उंचाविण्यासाठी दर महिन्यातील उत्कृष्ट कामगीरी करणारे पोलीस अंमलदार यांचा गुणगौरव व उत्कृष्ट कामगीरी करण्यास प्रोत्साहन देणा-या संकल्पनेतुन पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र देशमुख यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे दर्शनी भागात महिन्यातील उत्कृष्ट पोलीस अंमलदार यांचा गुणगौरव करण्यासाठी लावलेल्या फलकाचे दि. २६/१२/२०२१ रोजी मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रविणकुमार पाटील यांनी अनावरण केले.
सदर वेळी मा. पोलीस अधिक्षक श्री. प्रविणकुमार पाटील यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार यांना प्रलंबित गुन्ह्याची तात्काळ निर्गती करणे, मालाविरुध्दचे गुन्हे उघडकीस आणणे, फरार व पाहिजे असलेले आरोपी पकडणे तसेच दोषसिध्दीसाठी कुशल तपास करून उत्कृष्ट कामगीरी करण्याबाबत मार्गदर्शन करून उत्कृष्ट कामगीरी करणारे अंमलदारांचा फोटो व त्यांची कामगीरीची माहिती सदर फलकावर लावण्यात येईल असे सांगून या महिन्यात उत्कृष्ट कामगीरी करणारे पोलीस अंमलदार पोहेकॉ/६०३ ललित सुभाषराव पाटील व पोना/१३७९ तुकाराम महादु गवळी यांचा गुणगौरव केला.
Tags
news


