नाशिक येथे भाजपा कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांचा सत्कार






शिरपूर : नाशिक येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांचा सत्कार करण्यात आला.




धुळे व नंदुरबार जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून विधान परिषदेवर भारतीय जनता पार्टीतर्फे महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाल्याने नाशिक येथे दि. 4 डिसेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला.





यावेळी महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत  पाटील, प्रदेश संघटनमंत्री श्रीकांत भारतीय, माजीमंत्री आमदार गिरीश महाजन, माजीमंत्री आमदार जयकुमार रावल, धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हिनाताई गावित, विभाग संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, माजीमंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित, नाशिकचे आमदार देवयानी फरांदे, धुळे महापौर प्रदीप कर्पे, धुळे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, धुळे महानगर अध्यक्ष अनुप अग्रवाल आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने