पुण्यातील नामांकित ज्वेलर्सला हातचलाखीने गंडा घालणाऱ्या महिलेला अटक प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे: पुणे येथील नामाकिंत दुकानात गंडा घालणाऱ्या आरोपी महिलेचं नाव पुनम परमेश्वर देवकर असे असून तिच्याकडून पोलिसांनी चोरी केलेला मुद्देमाल जप्त केला आहे. हडपसर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत आरोपी महिलेला बेड्या ठोकल्या आहेत.

उपलब्ध माहितीवर, पुणे शहरातील चंदुकाका सराफ अँड सन्स, पुन. ना. गाडगीळ या नामांकित ज्वेलर्समध्ये आरोपी महिलेने हातचलाखीने चोरी केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये उघड झालं आहे. ज्वेलर्समधील काऊंटरवर असलेल्या व्यक्तीला सोन्याची अंगठी दाखविण्यास सांगून त्यानंतर त्या व्यक्तीचे लक्ष विचलीत करुन सोन्याच्या अंगठी ऐवजी बनावट अंगठी ठेवत असे. सदर महिला ही आधी एका ज्वेलरी शॉप मध्ये काम करत होती त्यामुळे तिला स्टिकर्स वगैरेची देखील चांगलीच माहिती असल्याने ती लवकर हातात येत नव्हती .

सदर महिला ही सोन्याची अंगठी पाहण्यास घेत असे आणि त्यानंतर मुळ अंगठी काढून घेवून त्या ठिकाणी दुसरी बनावट अंगठी ठेवून निघून जात होती. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सदर संशयित महिलेची चेहरेपट्टी, हावभाव, चालण्याची पध्दत याची सखोल माहिती घेवून त्याआधारे मगरपट्टा हडपसर ते बिबवेवाडी पर्यंतचे अनेक ठिकाणचे फुटेज पाहत संशयित महिला ही बिबवेवाडीपर्यंत पोहचली असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. आरोपी पुनम परमेश्वर देवकर ही याआधी अष्टेकर ज्वेलर्स, लक्ष्मीरोड या ठिकाणी सेल्समन म्हणून दुकानात कामास होती. त्या ठिकाणी देखील कामास असताना चोरी केल्यामुळे विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता.


 
आरोपी महिला ही दुकानात दागिने पाहण्यास गेल्यानंतर सोन्याचे अंगठ्या पाहण्याचा बहाणा करून दरम्यानच्या कालावधीमध्ये कधी पाणी व चहाची मागणी करून सेल्समनचे लक्ष विचलीत करायची आणि त्यानंतर मुळ सोन्याची अंगठी लांबून तिच्याकडे तिच्याकडील बनावट सोन्याची अंगठी त्यावर यापुर्वीचे ठिकाणाहून चोरून आणलेले स्टिकर लावून तिथे ठेवून द्यायची. काही दिवस गेल्यावर हा प्रकार लक्षात आला तरी तोवर ही महिला पसार झालेली असायची . पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तपास करुन आरोपी महिलेला अटक केली असून तिच्याकडून आणखी देखील गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने