शिरपूर - आज दिनांक ०४/१२/२०२१ रोजी पोलीस निरीक्षक श्री शिवाजी बुधवंत, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, शिरपुर पोलीस ठाणे हद्यीतील वाडी खु गावात सुखराम पवार नावाचा इसम अग्नीशस्त्राची विक्री करण्याच्या उद्येशाने त्याचे कब्ज्यात अवैधरित्या गावटी कटा बाळगुन वाडी खु गावात फिरत आहे, अशी बातमी मिळाल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखचे अधिकारी व कर्मचारी यांनी वाडी खा गावात जावुन सदर इसमाचा शोध घेता तो वाडी गावातील अश्वीनी बिअर बार समोरील रोडवर मिळून आल्याने त्यास ०९.४५ वाजता ताब्यात घेवून त्याचे नांव गाव विचारता त्याने त्याचे नांव सुखराम रेतम पवार वय २३ धंदा शेती रा. मु.पो. रायचुल, ता. पानसेमल जि. बडवाणी असे सांगितले. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात खालील वर्णनाचे गावठी कट्टा (पिस्टल) मिळुन आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे,
१) ५०,०००/- रु. किं.चे दोन गावठी कटटे (पिस्टल) २) २,०००/- रु.किं. चे चार जिवंत काडतुस
३) ५,०००/- रु. किं.चा एक मोबाईल
असा एकुण ५७,०००/- रु. किं.चा मुद्येमाल आरोपी नामे सुखराम रेतम पवार याचे कब्ज्यातुन मिळुन आल्याने तो दोन पंचासमक्ष जप्त करण्यात आला असुन सदर आरोपी विरुध्द शिरपुर शहर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम सन १९५९ चे कलम ३ / २५ सह मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे पोशि/ महेंद्र देवराम सपकाळ, स्था.गु.शा. धुळे यांनी फिर्याद दिली आहे.
सदरची कारवाई श्री. प्रविणकुमार पाटील, पोलीस अधीक्षक, धुळे श्री. प्रशांत बच्छाव, अपर पोलीस अधीक्षक, धुळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. शिवाजी बुधवंत, स्था.गु.शा., धुळे, सपोनि / प्रकाश पाटील, पोसई योगेश राऊत, पोसई/बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ/ श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संजय पाटील, संदीप सरग, योगेश चव्हाण, महेंद्र सपकाळ, मयुर पाटील, तुषार पारधी, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी अशांनी केली आहे.
Tags
news


