एस पी डी एम महाविद्यालयात मराठी वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन संपन्न







शिरपूर :  
येथील किसान विद्या प्रसारक संस्थेच्या एस पी डी एम महाविद्यालयात मराठी विभागातर्फे मराठी वाङ्‌मय मंडळाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर व्ही  एम पाटील यांच्या हस्ते व डॉ आर एन लुंगसे यांच्या अध्यक्षते खाल करण्यात आले . शैक्षणिक वर्ष 2021  /22 मधील या वाङ्‌मय मंडळातील विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला .



 मंडळाच्या अध्यक्षपदी तृतीय वर्ष कला मराठी या वर्गातील पाहूबा  कोळी यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली . याप्रसंगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील पीएचडी प्राप्त प्राध्यापक व नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण प्राध्यापक यांचा सत्कार मराठी विभागाच्या वतीने करण्यात आला . उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक विभाग प्रमुख व उपप्राचार्य डॉक्टर फुला बागुल यांनी केले .प्रास्ताविकातून त्यांनी मंडळाची भूमिका विशद करून या शैक्षणिक वर्षापासून बहिणाबाई चौधरी प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु होत असल्याची माहिती दिली .उद्घाटनपर भाषणात  प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील यांनी भाषेचे जीवनातील महत्त्व विशद केले . शब्द जपून वापरावेत . सर्व भाषांचा व्यासंग करावा . भाषेने व्यक्तिमत्व सुसंस्कारित होते 


.सत्कारार्थी प्राध्यापकांच्या वतीने पदार्थविज्ञान विभागाचे प्राध्यापक चंद्रकांत सोनार यांनी सत्काराबद्दल आभार मानले . सोनल देसले, जयेश माळी,गायत्री सावळे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणातून डॉक्टर रजनी लुंगसे यांनी मराठी वाङ्‌मय मंडळातून घडलेल्या विद्यार्थ्यांची माहिती दिली . मराठी वाङ्‌मय मंडळ विद्यार्थ्यांच्या वाङ्‌मयीन जाणिवा विकसित करते . जीवनाला आकार देते असे प्रतिपादन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सौ मंजुळा साळवे यांनी केले .आभार प्रदर्शन प्राध्यापक विशाखा पवार यांनी केले . याप्रसंगी  डॉ . एस पी महिरे, डॉक्टर   ए एम देशमुख, डॉक्टर डी एल पावरा, डॉक्टर सौ अहिरराव,  डॉ अनिल गायकवाड,  डॉ . दीपक लहारे यांचा तसेच प्राध्यापक चंद्रकांत सोनार प्राध्यापक किशोर राजपूत , प्राध्यापिका वंदना सोनवणे  ,प्राध्यापक  लोकेश सोनार, प्रा. गोविंद पावरा यांचा नेट-सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला .याप्रसंगी डॉक्टर मनीषा पाटील ,डॉक्टर धर्माधिकारी, डॉक्टर वर्मा ,डॉक्टर भारती वळवी ,  डॉ . आठवले ,प्राध्यापक पठाण ,डॉक्टर चव्हाण, डॉक्टर भारती पाटील उपस्थित होते .कार्यक्रमासाठी कुलसचिव व विश्वस्त श्री रोहित रंधे, प्राचार्य डॉक्टर व्ही एम पाटील, उपप्राचार्य प्राध्यापक पी जी पारधी, प्राध्यापक ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.   सोनल देसले , वंदना पावरा, यांनी मनोगत व्यक्त केले .  डॉ . युवराज पवार ,नयना खंडारे, संदीप कुंभार, तुषार गवळे, जागृती शिरसाठ , गायत्री साळवे, जयेश माळी यांनी परिश्रम घेतले

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने