पटेल परिवाराच्या प्रयत्नाने विखरण येथील युवक जितेंद्र पाटील याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया, नातेवाईकांनी मानले पटेल परिवाराचे आभार




शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या प्रयत्नाने विखरण ता. शिरपूर येथील जितेंद्र श्रावण पाटील (वय 26 वर्षे) याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून नातेवाईकांनी पटेल परिवाराचे प्रत्यक्ष भेटून आनंद व्यक्त करुन आभार मानले आहेत.

जितेंद्र पाटील याला माकड हाड येथे गाठ व मज्जा रज्जु भागाच्या खाली पोकळी होती. अतिशय क्रिटीकल ऑपरेशन होते. पुणे, नाशिक, धुळे हाॅस्पिटल येथे जाऊन आले होते. तेथील डॉक्टर्स ने त्याला मुंबई येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. स्थानिक डाॅक्टर यांना दाखविले असता त्यांनी तीन लाख रुपये खर्च सांगितला ते ऐकून रुग्ण व त्यांचे मामा हे चिंताग्रस्त झाले. त्याचे निदान व ऑपरेशन साठी तीन लाख रुपये खर्च होता. परिस्थिती अतिशय जेमतेम असल्याने ऑपरेशन करणे शक्य नव्हते. पेशंटचे मामा परशुराम विनायक पाटील (शिरपूर) हे सामाजिक कार्यकर्ता भालेराव माळी यांना भेटले व सर्व हकिकत सांगितली. त्यांनी लगेचच उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याशी भेट घालून पेशंटला मदत करण्याबाबत विनंती केली. भूपेशभाई पटेल यांनी आमदार कार्यालयातील रुग्णसेवक दिलीप माळी यांना कागदपत्र गोळा करण्यासाठी सांगितले व पेशंटला दाखल करण्यासाठी सूचना केली. जितेंद्र याला मुंबई येथे नामांकित हाॅस्पिटल मध्ये दि. 27/11/2021 ला दाखल केले व दि. 29/11/2021 ला यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पूर्ण झाली. शस्त्रक्रियेच्या खर्चासह रुग्ण व नातेवाईक यांची राहण्याची, भोजनाची व इतर व्यवस्था पटेल परिवाराच्या सहकार्याने करून देण्यात आली.

पटेल परिवाराने रुग्णाला मदतीचा हात पुढे केल्याने तीन लाख रुपये खर्चाची क्रिटिकल अशी शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करवून दिल्याबद्दल तसेच रुग्णाला जीवनदान मिळाल्याबद्दल विखरण येथील ग्रामस्थांनी व नातेवाईक यांनी जनक विला निवासस्थानी मंगळवारी 7 डिसेंबर रोजी आ. काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांची भेट घेऊन आनंद व्यक्त केला व आभार मानले. व्यक्त केले. यावेळी रुग्ण जितेंद्र पाटील नातेवाईक परशुराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, रुग्णमित्र दिलीप माळी, स्वीय सहाय्यक सुनिल जैन, स्वीय सहाय्यक योगेश्वर माळी, अनेक मान्यवर उपस्थित होते.




--

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने