महिलांचे व मुलींचे विषय गांभीर्याने घेणे गरजेचे - पो.नि.तयूब मुजावर प्रतिनिधी दत्ता पारेकर




पुणे:इंदापुर येथे तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तयूब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली शहा सांस्कृतिक भवन या ठिकाणी पोलीस क्षेत्रातील प्रमुख पोलीस अधिकारी,बिट अंमलदार,कर्मचारी तसेच तालुक्यातील सर्व पोलीस पाटील,महिला दक्षता समितीच्या सदस्यांच्या समवेत तक्रार निवारण दिन कार्यक्रम संपन्न झाला.

यामध्ये गावागावांतील बँक सराफ कट्टा यांच्या सुरक्षा बाबत, महिला व शिक्षण घेत असणाऱ्या मुली विषयी होणाऱ्या अपराधा बाबत व त्या विषयी घ्यावयाची दक्षता बाबत, गावागावात शांतता व सलोखा राहावा तसेच कोविड बाबत चर्चा करण्यात आली. त्याच प्रमाणे गावागावातील तक्रादार यांच्या समस्या बाबत माहिती घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला गेला.

यावेळी अनेक तक्रारींचे निवारण करताना पोलीस निरीक्षक तयूब मुजावर म्हणाले की,कायदा सुव्यवस्था राखण्यास पोलीस कटीबद्ध असून इंदापूर शहर व परिसर गुन्हेगार मुक्त करायचं आहे. इंदापूर शहराचे व शहरातील मालमतेचे संरक्षण करणे पोलिसांची जबाबदारी असून दररोज गस्तीसाठी पाच ते सहा गाड्या फिरत आहेत.

मुजावर पुढे म्हणाले की, विद्यालय व महाविद्यालय सुरू झाल्याने अनेक मुलींच्या बाबतीत छेडछाडीची प्रकरणे घडताना दिसून येत असून अशा प्रकरणाबाबत गांभीर्याने लक्ष देऊन छेडछाड करणाऱ्या कायदेशीर असे गंभीर कारवाई करण्यात येईल. यामध्ये मुलगी अल्पवयीन असेल तर संबंधित व्यक्तीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही यावेळी पो.नि. मुजावर यांनी दिला.

तक्रार निवारण दिनाच्या अनुषंगाने अनेक गावातील पोलीस पाटलांच्या सांगण्यावरून पोलीस निरीक्षक मुजावर यांनी इंदापूर तालुक्यातील अनेक गावातील तक्रारी यावेळी सोडवल्या.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनवे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी ही तक्रार निवारण दिनानिमित्त मार्गदर्शन केले.

प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी शिस्तत असणे गरजेचे - 

इंदापूर तालुक्यातील प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनी शिस्त पाळणे आवश्यक आहे. आपापल्या गावांमध्ये बारकाईने लक्ष देऊन चोऱ्या माऱ्या व काही नवीन गोष्टी घडत असल्यास त्यांची माहिती पोलीस स्टेशनला देणे अतिशय गरजेचे आहे. आपापल्या गावांमध्ये बऱ्याच काही वाईट- चांगल्या गोष्टी तसेच  छोट्यामोठ्या तक्रारी च्या घटना घडत असतात परंतु त्या पोलीस पाटलांना माहीत नसतात कारण पोलीस पाटील याकडे बारकाईने लक्ष देताना दिसून येत नाहीत इथून पुढे असे घडल्यास त्यांच्यावर सुद्धा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशारा ही तक्रार निवारण दिनाच्या दिवशी इंदापूर पोलीस निरीक्षक टि.वाय. मुजावर यांनी दिला.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने