गौण खनिज चे अवैध वाहनावर अप्पर तहसीलदार यांची कारवाई, जीवे ठार मारण्याची धमकी ,शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल, अवैध गौण खनिज वाहतूक दरांची मुजोरी चांगलीच वाढली....






गौण खनिज चे अवैध वाहने अप्पर तहसीलदार यांनी पकडली म्हणून, रस्त्यावर वाहन आडवे लावून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन ताब्यातील वाहणे पळून नेली.....

शिंदखेडा पोलिसात गुन्हा दाखल, अवैध गौण खनिज वाहतूक दरांची मुजोरी चांगलीच वाढली....

शिंदखेडा- तालुक्यातील रुदाणे शिवारात गौण खनिज  जेसीबीच्या साहायाने दोन ट्रॅक्टर विना परवाना खोदून वाहतूक करीत असताना दोंडाईचा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी  ताब्यात घेऊन शिंदखेडा पोलिस ठाण्यात कारवाई कामी आणत असताना रस्त्यात त्यांना रस्त्यावर वाहन आडवे लावून अनधिकृतपणे जमाव जमवून त्यांना  रस्ता अडवून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या ताब्यातील दोन ट्रॅक्टर व एक जेसेबी मशीन यावरील चालक व मालकसह व  इतर 10 ते 12 जनांनी संबंधितांनी लहशत निर्माण करून,बळाचा वापर करून, हुज्जत घालून दांडगाईने पळवून नेली बाबतची फिर्याद स्वता: अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी शिंदखेडा पोलिसात दिली असून त्या नुसार शिंदखेडा पोलिसात गुन्हा 180/2021 भा द वी कलम353, 341, 506, 143, प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक  तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरावडे  हे करीत आहेत. मात्र शिंदखेडा तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूकदारांची चांगलीच मुजोरी वाढल्याचे बघावयास मिळत आहे.


      सविस्तर माहिती अशी की, दोंडाईचा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी शिंदखेडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  दि 7 डिसेंबर राजो दुपारी 12,40 वाजता त्यांना गुप्त माहिती मिळाली की, रुदाणे ता. शिंदखेडा येथे लामकनी रस्त्यालगत नाल्याजवळ जेसीबीच्या साहायाने मुरूम गौण खनिज कोरून  ट्रॅकरच्या साहाय्याने लामकानी येथे वाहतूक सुरू आहे. या बाबत अप्पर तहसीलदार यांनी तलाठी बादल जारवाल यांना सदर ठिकाणी जाऊन चौकशी करण्यास सांगितले त्या नुसार तलाठी यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांनी अप्पर तहसीलदार यांना  दुपारी 3.55 वाजता सांगितले की, सदर ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने मुरूम खोदून दोन ट्रॅक्टरच्या साहायाने वाहतूक सुरू असून त्यांच्याकडे खोदकाम व गौण खनिज वाहतूकीचा कोणताच परवाना नसल्याने सर्व वाहने ताब्यात घेतली असून या ठिकाणी  बेकायदेशीर जमाव जमा झाला आहे. माझ्या मदतीला तात्काळ यावे असे सांगीतले त्या नुसार अप्पर तहसीलदार सुदाम महाजन हे तात्काळ दुपारी 4.45 वाजता खाजगी वाहनाने पोहोचले घटना स्थळी मुरुमाणे भरलेली ट्रॅक्टर क्र. MH 18,Z 83 28 व त्याला विना नंबरची लाल रंगाची ट्रॉली, दुसरे ट्रॅक्टर लाल रंगाचे विना नंबर व त्यावर प्रकाश मगन पाटील रा. लामकनी असे लिहिलेले व त्याला मुरुमाने भरलेली लालरंगाची ट्रॉली क्र. MH18Z 5751 व पिवळ्या रंगाचे जेसेबी क्र MH18,BC 8983 आढळून आले त्यांच्या कडे कोणताच परवाना नसल्याने त्यांना अप्पर तहसीलदार यांनी शिंदखेडा पोलिसात घेऊन येत असताना रेवाडी गावाजवळील बुराई नदीच्या पुलाच्या अलीकडे काही इसमानी बोलेरो गाडी क्र MH18 BG 2753 रस्त्यात उभी करून अप्पर तहसीलदार यांच्या गाडीसह सर्व वाहनाचा रस्ता अडविला व गाडीतून वाडी येथील गोविंदा नगराळे उतरून अप्पर तहसीलदार यांच्या जवळ येऊन त्यांना असभ्य भाषेत बोलून "तुझा आज तमाश्याच उभा करतो" तलवारीने मुंडकी उडवतो अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तुझ्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत केस दाखल करण्याची धमकी देऊन तेथील उभे असलेले वरील क्रमाक्रमाच्या ट्रेकटर च्या चालकांना बेकायदा जमाव जमून ते परत नेण्याचे सांगितले हे चालू असताना तेथून शेवाडे मंडळ अधिकारी परमेश्वर धनगर यांनी तलाठ्यांच्या मदतीने जेसेबी मशीन  घटनास्थळावरून नेऊन  सतारे शिवारात रस्त्याचे ठेकेदार येस बी देशमुख कंपनी यांच्या खडी क्रॅशर प्लांट वर नेऊन तेथील रखवालदार यांच्या ताब्यात देण्यात आले. तेथेही गोविंदा नगराळे व इतर दहा 12 साथीदार येऊन वाचमनच्या ताब्यातील जेसेबी मशीन पळवून नेले असे फिर्यादीत म्हटले असून शिंदखेडा पोलिसात ट्रॅक्टर मालक  विजय पाटील रा लामकनी, ट्रॅक्टर चालक शंकर पांडू भिल रा रुदाणे, ट्रॅक्टर चालक नाना हिलाल पवार रा रुदाणे, ट्रॅक्टर मालक प्रकाश मगन पाटील रा लामकनी, जेसीबी मशीन चालक लक्ष्मण ओराम, व गोविदा नगराळे रा वाडी, इतर  10 ते 12 अनोळखी इसमावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करित आहेत..  या सार्‍या प्रकारावरून असे लक्षात येते की शिंदखेडा तालुक्यात महसूल विभागाचा व पोलीस यंत्रणेचा अवैध गौण खनिज वाहतूक दारांना अभय तर नाही ना अशी चर्चा पारिसरात सुरू आहे.  वरील घटनेवरून असे लक्षात येते शिंदखेडा तालुक्यात अवैध गौण खनिज दारांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही असा साधा प्रश्न कोणालाही पडू शकतो. अवैध वाळू, डबर, माती यासह आदी गौण खनिज दारांची मुजोरी चांगलीच वाढली असल्याचे लक्षात येते. संबंधित यंत्रणेने यांना आवर घालावा अन्यथा एखादी मोठी घटना होण्याची दाट शक्यता या सार्‍या प्रकारावरून लक्षात येत आहे..


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने