कुमठा खुर्द ता.उदगीर येथे
आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोगनिदान व औषधोपचार शिबिर प्रसंगी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या प्रतिमेचे भव्य दिव्य
सजावट करुन सर्वांनी अभिवादन करण्यात आले
त्यावेळी अनेक तज्ञ डॉक्टर उपस्थित होते .कान नाक घसा तज्ञ . बालरोग तज्ज्ञ असे अनेक डॉक्टर उपस्थित होते आणी रक्तदान शिबिर मध्ये अनेक युवकांनी पुढाकार घेतला अनेक व्यक्तींचे गावातच आजारावर उपचार मिळाल्यामुळे त्यांना आनंद वाटला व या कार्यक्रमात सर्वजन उपस्थित होते वृद्ध युवा स्री पुरुष महीला व डाक्टर यांना गावकऱ्यांनी व केंद्र ज्वेलर्स चे मालक व रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंटर चे प्रोजेक्ट चेअरमन भागवत केंद्रे यांनी
आपण पुर्णवेळ उपस्थित राहून महत्वपूर्ण मार्गदर्शन व योगदान दिले त्याबद्दल भागवत केंद्रे यांनी व समस्त गावकऱ्यांनी सर्व डॉक्टर्स यांचे आभार व्यक्त केले
रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान कुमठा खुर्द यांच्यामार्फत सदरचा उपक्रम राबवला गेला.
Tags
news
