शिरपूर : वाराणसी तथा काशी नगरीसाठी जगातील सर्वाधिक लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (दि.१३ डिसेंबर) रोजी 'दिव्य काशी, भव्य काशी' हे स्वप्न प्रत्यक्षात आणले त्यानिमित्त शिरपूरात भाजपा व आध्यात्मिक आघाडी तर्फे येथील श्रीराम मंदीरात भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते महाआरती करण्यात आली. व यावेळी उपस्थितांनी वाराणसी येथील दि. १३ डिसेंबर रोजी सर्व ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी भव्य कार्यक्रम झालेत. त्या 'दिव्य काशी-भव्य काशी' या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बघितला. याप्रसंगी धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, मठाधिपती महंत सतिषदास भोंगे महाराज, दिव्य काशी, भव्य काशी तालुका संयोजक बापु मोतीराम पाटील, शहर संयोजक ह. भ. प. संतोष महारु माळी, शहर सह संयोजक, भागवतकार प्रमोद भोंगे महाराज, खंडेराव मंदीर उपाध्यक्ष संजय आसापुरे, महेंद्र पाटील, अविनाश शिंपी, ह. भ. प. सुधाकर महाराज गिधाडेकर, वारकरी साहित्य परिषद तालुकाध्यक्ष ह. भ. प. संजय चव्हाण अर्थेकर,ह.भ.प.गजानन महाराज वाघाडीकर ह. भ. प. रघुनाथ मोरे, ह. भ. प. श्याम धाकड, ह. भ. प. बाबुलाल मराठे आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
Tags
news
