नंदुरबार प्रतिनिधी - नंदुरबार जिल्ह्यामधील पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये राबविण्यात आलेल्या अलर्ट मोहिमेअंतर्गत तीन पिस्तूल व तीन तलवारीसह शस्त्रे जप्त केली आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार जिल्ह्याचे नवे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ऑल आउट मोहीम राबवण्यात येत होती या अंतर्गत शहादा नंदुरबार आणि नवापूर या तीन तालुक्यातील रविवारी मध्यरात्री नंदुरबार जिल्हा पोलिसांनी धाड टाकली यात तीन पिस्तुलं तीन तलवारी चाकू सुरे गुप्ती यासारखे जप्त केली आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणे आणि विकणारे यांची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना प्राप्त झाली होती त्याआधारे अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार ,उपाध्यक्ष सचिन अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार नवापूर शहादा तळोदा शहर व तालुका पोलिस ठाण्याला सतर्क करण्यात आले होते .या अंतर्गत पोलिसांनी बंदोबस्त लावला होता यावेळी नंदुरबार शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात विजय काशिनाथ जाधव वय 25 रा. अभिनव कॉलनी सेंधवा ता. बडवानी हा तरुण मध्यप्रदेश राज्यातील असून रविवारच्या मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास संशयित रित्या फिरताना आढळला पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्यांच्याकडे 55,000 रुपये किमतीचे लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तूल व 1500 किमतीचे 3 जिवंत काडतुसे आढळून आली आहेत. पोलिसांनी त्यास अटक केली आहे.याप्रकरणी शिपाई योगेश पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे अवैध शस्त्र बाळगणे म्हणजे आदेशाचे उल्लंघन करणे तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 35 चे उल्लंघन यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी करत आहे
तसेच नवापुर तालुक्यातील चिंचपाडा येथे देवफळी परिसरात जगन्नाथ प्रकाश गोंडा रा. काला सुना पो. नोंडाजरी जिल्हा गंजम ओरिसा राज्यातील तरुण मध्यरात्री संशयास्पद रस्त्यात वितरण आढळला त्याच्याकडे चौकशी केली असता 25,000 रुपये किमतीचे लोखंडी पिस्तूल सापडले पोलिस नायक जितेंद्र तोरवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यानंतर अवैध पिस्तूल बाळगणारा सचिन दिलीप तांबोळी वय 24 शिवाजी नगर शहादा याला शहादा शहरातील शिरूर येथे पकडण्यात आले पोलीस शिपाई विजय देवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .त्याच्याकडून 25 हजार रुपयांचे पिस्तूल आणि 500 रुपये किमतीचे काढतूस जप्त करण्यात आले आहेत.
शिवाय नंदुरबार शहरातील महाराष्ट्र व्यायाम शाळा परिसरात चाकू घेऊन फिरणारे नितीन धनदास कोकणी यास पकडण्यात आले. दरम्यान नवापूर शहरातील देवफळी परिसरात राहुल संजय गावित रा. चिंचपाडा यास विसरवाडी येथून तुकाराम शंकर गावीत राहणार चिखली तालुका नवापूर यास शहादा शहरातील जुनी भाजी मंडई परिसरात गोकुळ सुनील सोनवणे असे 3 जण धारदार तलवार बाळगताना पकडले गेले त्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला .
या शिवाय मुकेश वसावे राहणार कुंबेफळी चिंचपाडा येथील यांच्याकडून धारदार लोखंडी गुप्ती तर चिंचपाडा बस थांब्यावर सुरा घेऊन फिरताना भानुदास मनोज वसावे यास अटक करण्यात आली आहे.
Tags
news



