शिरपूर - तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या व महत्वपूर्ण असा सहकारी प्रकल्प विविध राजकीय व न्यायिक कारणांनी मागील दहा वर्षापासून बंद असून सदर कारखाना सुरू करावा यासाठी वारंवार मागणी पुढे येत असून देखील अनेक प्रयत्न केल्यानंतर देखील सदर कारखाना बाबत आजपर्यंत कोणत्याही सकारात्मक निर्णय होऊ शकलेला नाही.
यासाठी अनेक घटक हे जबाबदार आहेत सर्वप्रथम या तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांनी कारखाना या विषयालाच बगल दिल्याने याविषयी कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही, अनेक अवहेलना सहन केल्यानंतर देखील शेतकऱ्यांनी या कारखान्याच्या संचालक मंडळावर ज्या लोकांची निवड केली ते सर्व शिष्टमंडळ निष्क्रिय व अकार्यक्षम निघाले असून राजकीय अनास्थेचा बळी ठरले आहे. तालुक्यात यापूर्वी जेव्हा जेव्हा कारखाना सुरू करण्यासंदर्भात चर्चेला सुरुवात होते तेव्हा तेव्हा राजकारण, सत्ताकारण व अहंम आडवे आले आहेत .यासाठी विविध कारणे पुढे केली गेली यात प्रामुख्याने कर्जाच्या विषय ,असो बँकेची जप्ती असो, किलस्ट न्यायालयीन प्रक्रिया असो, कारखाना मल्टीस्टेट असल्यामुळे दिल्लीची परवानगी असो ,अथवा आमचे राज्यात सरकार नाही, आम्ही सरकारमध्ये नाही म्हणून निर्णय घेऊ शकत नाही, अशी काही राजकीय कारणे असो या सर्वच कारणांना पुढे करून राजकारण्यांनी कारखाना सुरू करण्याऐवजी त्याला बंद ठेवण्यातच धन्यता मानली आहे .आणि त्यामुळे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी किंवा खाजगी साखर उद्योग उभे करण्याची मानसिकता असणाऱ्या नेत्यांच्या मानसिक विकृतीमुळे , तालुक्यात कारखान्याबाबत सकारात्मक निर्णय झाले नाहीत.
शिवाय तालुक्यातील शेतकऱ्यांच्या राजकीय व मानसिक गुलामगिरीमुळे व तर अकार्यक्षम लोकांना निवडून दिल्याने आणि यापूर्वी कारखान्यावर सत्ता काबीज करून झालेले अनेक भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार या सर्व कारणास्तव कारखाना हा मृत अवस्थेत आहे .
मात्र तरीदेखील तालुक्यातील काही शेतकऱ्यांना व समाजसेवकांना आज देखील सदर कारखाना सुरू व्हावा अशी आस आहे आणि याच आशेवर पुन्हा एकदा शिरपूर साखर कारखाना च्या धूर निघण्याच्या आशेवर शिरपूर साखर कारखाना बचाव समिती स्थापन झाली असून या समितीच्या माध्यमाने कारखाना सुरू करण्यासंदर्भात सर्व स्तरावर व्यापक चर्चा विचारविनिमय होत असून आगामी काळात बचाव समिती सनदशीर मार्गाने व कायदेशीर मार्गाने लढा उभा करण्याच्या तयारीत आहे . निर्णयक्षम संचालक मंडळ जर निवडले गेले तर किमान भाडे तत्वावर देऊन कारखान्याला नवसंजीवनी देता येऊ शकते यादृष्टीने बचाव समिती प्रयत्न करत आहे
यासाठी कारखाना सुरू होण्यासाठी इच्छुक असलेल्या सर्वच शेतकरी, राजकीय व सामाजिक मंडळी एकत्र येऊन रणनीती तयार करत आहे या संदर्भात पुन्हा एकदा तालुक्यात दिनांक 4 डिसेंबर रोजी एक बैठक संपन्न झाली .शिरपुर येथील मेनरोडवरील काँग्रेस भवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .त्यात काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या मागील बैठकीचा संदर्भ घेवुन शासकीय अधिकारी यांचेकडे उपोषण यापूर्वीही झालेले आहेत. आता संचालक मंडळा ची मुदत संपली आहे त्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरु करणे आवश्यक होते. ती जबाबदारी निवर्तमान तसेच अकार्यक्षम संचालक मंडळाने लावली नाही. सभासद आणि शेतकऱ्यांनी परत एकदा त्यांना यासंदर्भात जाब विचारला पाहिजे.कारखाना चालवत नाहीत व सत्ता ही सोडत नाहीत. त्याकरिता शिसाकाच्या सर्व सभासदांमधे जागृती करून शेतकरी कसा आर्थिकदृष्ट्या कसा संपेल असेच धोरण सत्ताधा-यांचे दिसत आहे. यासाठी आपण सर्वांनी ताकदीने "शिसाका बचाव समिती" च्या मागे खंबीरपणे व ताकदीनिशी उभे राहून लढाई करावी लागेल असे मत वक्त करण्यात आले .आगामी सर्व लढा व कायदेशीर बाबतीत अधिकार" शिसाका बचाव समिती" ला देण्यात आले आहेत. बैठकीसाठी शेतकरी बंधु,शिसाका सभासद, कामगार व पत्रकार बंधु मोठया संख्येने हजर होते. बैठकीस सर्वश्री मोहन पाटील, अॅड. गोपाल राजपूत, हेमराज राजपूत,शांतीलाल नथा पाटील, अॅड. हिरालाल परदेशी, अॅड. शांताराम महाजन ,कल्पेशसिंह जमादार, सरोज पाटील मॅडम, करंकाळ आबा, शाम पाटील, अॅड. संतोष पाटील ,शिवाजी बोरसे, राजेन्द्र देवरे,अॅड. महेश वाघ यांनी मार्गदर्शन केलेे.शिसाका बचाव समिती लवकरच कायदेशीर बाबी विचारात घेऊन पुढील दिशा ठरविणार आहे अशी माहिती शेत.सह.साखर कारखाना बचाव समिती च्या मोहन पाटील यांनी दिली आहे.
Tags
news




