धुळे शहरातुन विमल गुटखाची तस्करी करुन वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकास लाखोच्या मुद्देमालासह केले जेरबंद चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याची धडक कारवाई



धुळे - चाळीसगाव रोड पोलीस पोलिसांना विमल गुटखा तस्करी करणाऱ्या वाहनाला चालकासह व मुद्देमालासह अटक करून लाखोंच्या मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की
दि.०४रोजी सपोनि संदीप बी पाटील यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मालेगांव कडुन जळगांव कडे ट्रक क्रमांक एम एच १५ जी व्ही ९७४१ मध्ये विमल पान मसाला व तंबाखु जन्य पदार्थ भरून जात आहे. या माहिती वरून  पोउनि एन जी चौधरी, व पोलीस स्टाफ चे पथक तयार करून कारवाईचे आदेश देण्यात आले वरील पोलीस स्टाफ अशांनी हॉटेल द्वारका लॉज समोर सापळा रचुन सदर मालट्रक क्रमांक एम एच १५ जी व्ही ९७४१ हिचेवर पाळत ठेवून असतांना थोड्या वेळाने मालेगांव कडुन नंबरची संशयीत मालट्रक येतांना दिसल्याने पोलीसांनी सदर मालट्रक थांबविण्याचा इशारा केला परंतु सदर चालकाने पोलीस असल्याचे पाहून ट्रक न थांबविता पळून गेला सदर ट्रकचा पोलीस स्टाफने त्यांचे कडील वाहनांनी पाठलाग करून मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक ०३ लगत हॉटेल इस्लामी ढाच्याजवळ दिनांक ०४/१२/२०२१ रोजी रात्री २३.३० वाजता पकडला व ट्रकवरील चालकास त्याचे नांव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव शेख हारुन शेख हुसेन वय ४८ वर्ष, व्यवसाय चालक. रा. गल्ली नं ९ आझादनगर, मालेगाव ता. मालेगांव जि. नाशिक अस सांगुन त्याचे सांबत असणाऱ्या क्लिनर ला देखील त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नांव मोहम्मद समील मोहम्मद सलीम वय १९ वर्षे, रा. कमालपुरा मालेगांव जि. नाशिक असे सांगुन सदर मालट्रक मध्ये मालाबाबत विचारले असता ते उडवा उडवीचे उत्तरे देत होते. नमुद बातमीची खात्री करणे कामी सदर मालट्रक वर चढून ताडपत्री उघडुन पाहीले असता त्यात खाको रंगाचे कार्टुन व सफेद रंगाच्या गोण्या सुगंधीत पान मसाला यांचा सुगंध येत असल्याने बातमीप्रमाणे खात्री झाली. सदर वाहनात पोलसांना



३६.२७,८००/- रु किमतीच्या खाकी रंगाच्या १७ कार्टून त्यापैकी एका खाको कार्टुन मध्ये चार पांढ-या रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्या एका पांढ-या प्लास्टीकच्या गोणीमध्ये केसर | युक्त विमल पान मसाला नावाचे एकुण ५० पॅकेट्स एका पॅकेट्स मध्ये २२ पुडया प्रत्येक पॅकेटची किंमत १८७ रुपये प्रमाणे असे एकूण ९७ कार्टुन मध्ये एकुण १९.४०० पैकेट्स


६,२७,०००/- रु किमतीच्या १९ पांढ-या प्लास्टीकच्या गोण्या एका पांढ-या प्लास्टोकच्या | गोणीमध्ये ५ छोटया पहिल्या गोण्या प्रत्येक छोटया गोणीत ४ छोटया प्लास्टीकच्या गोण्या त्यात प्रत्येकी छोटया प्लास्टीक गोणीत V-१ टोबेको नावाचे ५० पाकीट प्रत्येक पाकीट मध्ये एकूण २२ पुडया प्रत्येक पॅकेट्सची किंमत ३३ रुपये असे एकूण १९ पांढ-या रंगाच्या मोठ्या प्लास्टोक गोणीत १९००० पॅकेटस


२५,००,०००/ रुपये किमतीची एक लाल रंगाची अशोक लेलंड कंपणीची १२ चाकी मालट्रक क्रमांक एम एच १५ व्ही ९७४१ तिच्या केबीन वर इंग्रजीत GOODS CARRIER त्याचे खाली MILEGA MUKKADAR असे लिहलेले आहे तसेच पुढील काचेवर YAARAB असे लिहलेले असून सदर मालट्रक पुर्ण काळ्या रंगाच्या ताडपत्रीला नायलॉन दोरखंडाने बांधलेली तिचा चेचीस | क्रमांक MB KACHD.JPWG३७१२ अशी जु.वा. कि.अं. व इंजिन क्रमांक JWPZ१५४२७९
असा एकूण ६७.५४,८००/- एकण किमत
तरी बरोल वर्णनाचा व किमतीचा मालाबाबत ताब्यात घेतलेल्या चालक व क्लिनर यांना विचारपुस
करण्याचे उद्देशाने वाहतूक करतांना मिळून आले म्हणून त्यांचे विरुद्ध चाळीसगांव रोड पोलीस ठाण्यात भादवि कलम ३२८  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोउप एन जी चौधरी हे करीत आहेत.


सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील सो, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव सो. उपविभागीय पोलीस अधिकारी धुळे शहर विभाग दिनकर पिंगळे सो यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली सपोनि संदिप पाटील, पोउनि एन.जी. चौधरी, पोउपनि नासिर पठान, हेका पंकज चव्हाण, हेकॉ  कैलास बाघ, पोना  भुरा पाटील, पोना/  अविनाश पाटील, पोना  संदीप कढरे, पोका /  हेमंत पवार, पोका/ स्वप्नील सोनवणे, पोका/ सोमनाथ चारे, पोको  प्रशांत पाटील, पोकों/ शरद जाधव व चालक असई किरण राजपुत अशांनी केली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने