एड्स सप्ताहानिमित्त प्रगती फाउंडेशन तर्फे विविध उपक्रम



शिरपूर/प्रतिनिधी
एड्स सप्ताहनिमित्त प्रगती फौंडेशन शिरपूर तर्फे विविध उपक्रम राबविण्यात आले असून यात जनजागृतीपर जाहिरातींचे प्रकाशन, तरुणांना प्रबोधन करणे, कंडोम डेपो लावने आधी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रगती फाऊंडेशन शिरपूर तर्फे होळनांथे येथील  प्राथमिक आरोग्य केंद्रात जनजागृतीपर जाहिरात पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.  यात एड्सचे कारणे व घ्यावयाची काळजी या संदर्भात सविस्तर माहिती असलेले पत्रक  होळनांथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष पावरा, औषध निर्माण अधिकारी राजेंद्र पावरा, आरोग्य सेवक कासम पिंजारी, आरोग्य सहाय्यक श्री सोनवणे, योगेश कोळी आदींच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्याचप्रमाणे सलुन दुकान, पान दुकान, पेट्रोल पंप, आदी ठिकाणी कंडोम डेपो लावण्यात आलेत. तसेच ट्रक ड्रायव्हर, स्थलांतरित मजूर व तरुणांना एचआयव्ही संदर्भात माहिती देण्यात आली. कार्यक्रमास प्रगती फाऊंडेशनचे संचालक योगेश पाटील, सर्पमित्र मुक्तार फकीर, दक्ष नागरिक युवा मंचचे बबलू परदेशी, बारा बलुतेदार महासंघाचे गिरीश कुंभार, प्रवीण मराठे, भीम आर्मी संघटनेचे तालुका अध्यक्ष दीपक झाल्टे आदींचे सहकार्य लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने