राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तर्फे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी महाराष्ट्र युथ कार्निव्हल फेस्टिव्हलचे आयोजन -शुभम पाटील




 राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने युवक व युवती यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळवण्यासाठी  व प्रोत्साहन देण्यासाठी संबंध महाराष्ट्रभर महाराष्ट्र युथ कार्निव्हल अर्थात MAYOCA या युथ फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्हात विविध संस्कृतीक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.       
         या उपक्रमाची माहीती देतांना राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शुभम पाटील यांनी सांगितले की, शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी गव्हाणे यांच्या संकल्पनेतून कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून संपूर्ण धुळे जिल्ह्यात आणि शहरात घेण्यात येणार आहे. सबंध महाराष्ट्रातील ग्रामीण भागात छोट्या-छोट्या शहरात प्रचंड गुणवान व कला कौशल्य असलेल्या असंख्य विद्यार्थी व युवक आहेत.या सर्वांच्या गुणवत्तेला त्यांच्याकडे असलेल्या कलेला,प्रत्येक व्यासपीठ मिळालेच असे नाही.
 त्यामुळे या फेस्टिव्हल अंतर्गत वैयक्तिक गायन, वैयक्तिक नृत्य सामुहिक नृत्य, चित्रकला, मॉडेलिंग या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  पहिल्या टप्प्यात मुंबईसह राज्यातील प्रत्येक जिल्हात प्रत्यक्ष निवड चाचणी होणार असून निवड झालेल्यांची विभागीय स्तरावरील उपांत्य फेरीत प्रवेश मिळणार असून अंतिम फेरी मुंबई येथे होणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील विविध स्तरावरील विजेत्या स्पर्धकांना एकूण तब्बल २५ लाख रुपया पर्यंतची बक्षीस देणार आहेत. स्पर्धेची नोंदणी १२ डिसेंबरपासून सुरु झाली असून संपूर्ण नोंदणी प्रक्रिया ही आँनलाईन नोंदणी प्रक्रिया करण्यासाठी WWW.NSCMAYOCA.COM या संकेत स्थळावर जाऊन नोंदणी करावी. या माध्यमातून महाराष्ट्राच्या गुणवान कलाकारांना प्रोत्साहन मिळणार आहे ३१ डिसेंबर नंतर जिल्हात शहरात या स्पर्धेसाठी निवड चाचणी होणार आहे. जिल्हास्तरावरील निवड चाचणी मध्ये निवडलेल्या स्पर्धेकांना नाशिक येथील विभागीय उपांत्यफेरीत प्रवेश मिळणार असून त्यामधून राज्यपातळीवर स्पर्धेत प्रवेश मिळेल तरी, शिरपुर तालुक्यातील विद्यार्थी व युवक-युवतींनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शुभम सुनिल पाटील यांनी केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने