श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याला सरदार कोळेकर घराण्याच्या शाखांच्या वंशजांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण




 
प्रतिनिधी दत्ता पारेकर 
 
पुणे:श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्याला सरदार कोळेकर घराण्याच्या कोळेकरपाटील सुभेदार म्हसवडकर,कोळेकर पाटील कोळे,कोळेकरपाटील जयसिंगपुरकर,कोळेकर सरदार मोळे,कोळेकरबळवंतराव कोंडीग्रे,कोळेकर पाटीलपंचहजारी नांदल शाखेचे वंशज श्री नितीन कोळेकर पाटीलपंचहजारी
 शाखांच्या वंशजांना  उपस्थित राहण्याचे निमंत्रण..

महाराष्ट्राच्या मातीत अनेक ऐतिहासिक घराणे होऊन गेली त्या पैकी मध्ययुगीन कालखंडात कोळेकर घराण्याने स्वराज्यासाठी पराक्रम गाजवला त्या नंतरच्या कालखंडात कोळेकर घराण्याच्या अनेक शाखा झाल्या या पैकी छत्रपती शाहू महाराजाचे सुभेदार गणोजी कोळेकर यांची पुढील पिढी म्हसवड ला स्थायिक झाली. तर कोळेकर घराण्याचे मूळ असणाऱ्या कोळे शाखेतील सेटयाजी व राणोजी कोळेकर हे सरदार होऊन गेले त्यांच्या वंशजाना कोळे गावची पिढीजात पाटीलकी मिळाली. याच शाखेतून एक घर कोंबडवाडी या ठिकाणी स्थायिक झाले व परत जयसिंगपूर ला राहावयास गेले.कोळेकर घराण्यात सरदार यशवंतराव कोळेकर नामक सरदार होऊन गेले ते पुढे कर्नाटक मधील अहिणापूर मोळे या ठिकाणी स्थायिक झाले या गावांतील परंपरागत पाटीलकी व सरदारकीचा मान कोळेकर घराण्याला आहे. कोळेकर घराण्याच्या कवठे एकंद च्या शाखेतून पुढे कोंडीग्रे ची शाखा तयार झाली या शाखे ला बळवंतराव 'किताब आहे .स्वराज्याचे सरसेनापती संताजी घोरपडे यांचे सहाययक पंचहजारी बाजी कोळेकर यांना छत्रपती कडून नांदल गाव वतन मिळाले व ते त्या ठिकाणी स्थायीक झाले

महाराजाधिराज राजराजेश्वर श्रीमंत यशवंतराव होळकर ( प्रथम ) यांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यास ऐतिहासिक घराण्याचे वंशप्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याबाबत निमत्रंण देण्यात आले आहे तो मजकुर पुढिल प्रमाणे आहे 

जय मल्हार 
प्रति वर्षानुसार दि . ६ जानेवारी २०२२ रोजी किल्ले वाफगाव ( तालुका – खेड , जिल्हा – पुणे ) येथे श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर ( प्रथम ) यांचा राज्याभिषेक दिन सोहळा ” होळकर घराण्याच्या परंपरे प्रमाणे दिमाखात व आनंददायी वातावरणात साजरा करण्यात येणार आहे . आपल्या घराण्याचे भारताच्या इतिहासामध्ये मोठे योगदान आहे

तरी या राज्याभिषेक दिन सोहळ्याला आपल्या ऐतिहासिक घराण्याचे वंशप्रतिनिधी म्हणून घराण्याच्या पारंपारिक पोशाखात श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर ( प्रथम ) यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे असे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांनी सरदार कोळेकर घराण्याच्या कोळेकरपाटील सुभेदार म्हसवडकर शाखेचे वंशज कु.रविंद्र बाबासाहेब कोळेकर पाटील
कोळेकर पाटील कोळे शाखेचे वंशज संदीपराव कोळेकर पाटील 
कोळेकरपाटील जयसिंगपुरकर शाखेचे वंशज गणेशराव कोळेकर पाटील
कोळेकर सरदार मोळे शाखेचे वंशज बाबासाहेब कोळेकरसरदार
,कोळेकरबळवंतराव कोंडीग्रे शाखेचे वंशज श्री.तिरुपती कोळेकरबळवंतराव 
कोळेकर पाटीलपंचहजारी नांदल शाखेचे वंशज श्री नितीन कोळेकर पाटीलपंचहजारी
यांना
पत्राद्वारे केले आहे.

 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने