थाळनेर ( प्रतिनिधी) शिरपूर तालुक्यातील रासायनिक खत व बियाणे विक्रेत्यांचे तालुक्या स्तरीय ई परवाना बाबतचे प्रशिक्षण नुकतेच संपन्न झाले
शासनाने रासायनिक खते व बियाणे परवाना करिता नुकतीच संगणक प्रणाली कार्यान्वित केलेली आहे. सदर प्रणाली वरून खते व बियाणे विक्री नवीन/ नुतनीकरण /दुरुस्ती बाबतचे सर्व प्रकारचे प्रस्ताव हे सदर प्रणाली मार्फत सादर करणे बंधनकारक आहे .सदर प्रणाली ही महाराष्ट्र शासनाच्या आपले सरकार या पोर्टल वरून कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सदर प्रणाली वापराबाबत तालुकास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धुळे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील तंत्र सहाय्यक उमाकांत सावंत यांनी ई परवाना बाबत प्रोजेक्टर द्वारे तपशीलवार सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच धुळे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मनोज कुमार शिसोदे व पंचायत समितीचे कृषी अधिकारी मुकेश वर्मा, प्रभारी शिरपूर तालुका कृषी अधिकारी विशाल मोटे आदींनी कृषी विक्रेत्यांनी विचारलेला सर्व शंकांचे निरीक्षण केले. यावेळी तालुकास्तरीय कृषी विक्रेता संघटनेमार्फत सर्व मान्यवर अधिकारांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माफदाचे सचिव राजेंद्र भंडारी, तालुका अध्यक्ष ओंकार सिंग जाधव, गौरव अग्रवाल, हेमंत चौधरी, संजय पाटील, संजय अग्रवाल, गोपाल पाटील उज्वल निकम ,विवेक पाटील, आशिष अग्रवाल, लक्ष्मण मराठे, जयपाल सिंग राजपूत ,राधेश्याम पाटील, जगदीश पाटील ,भरत पाटील ,जितेंद्र संचेती व तालुक्यातील बहुसंख्य विक्रेते उपस्थित होते.
Tags
news


