शिरपुर तालुका प्रवासी संघटने ची त्रैवार्षिक नूतन कार्यकारिणी ची एकमता ने घोषणा करण्यात येवून अध्यक्ष पदी सामाजिक कार्यकर्ते राजेश मारवाड़ी यांची तर कार्याध्यक्ष पदी युवा नेतृत्व मयूर वैद्य यांची निवड करण्यात आली आहे.
उर्वरीत कार्यकारिणी पुढीलप्रमाणे उपाध्यक्ष - भुलेश्वर पाटील ( मांजरोद ), महासचिव - छगन गुजर ( निमझरी ), कायदेशीर सल्लागार - अॅड. सुहास वैद्य, कोषाध्यक्ष - निलेश के. अग्रवाल, मुख्य संघटक - विनायक कोळी, सचिव - भरत रोकड़े, सपंर्क प्रमुख - महेंद्र राजपूत, सहसचिव - मनोज भावसार, प्रसिद्धि प्रमुख - नवल कढरे तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून राजेन्द्र अग्रवाल ( संगही ), अशोक सोनवणे, अरुण ( पिंटू ) सोनार यांचा कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे.
आमदार अमरीशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे, महाराष्ट्र राज्य भाजपा उपाध्यक्ष बबनराव चौधरी, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, आर सी पटेल शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, उद्योजक चिंतनभाई पटेल व मान्यवरानी नूतन पदाधिकार्यांचे अभिनदंन केले आहे.
सामान्य जनता व खास करून विद्यार्थ्यांचे शिक्षणा चा विचार व काही खाजगी वाहन धारका कडून होणारी प्रवाशांची लूट या सर्व बाबींचा करून राज्य शासनाने एस टी कर्मचार्यांच्या न्याय्य मागण्या मान्य करून सम्मानजनक तोड़गा काढून मविम सरकारने कर्मचारी बड़ तरफी चा आदेश मागे घ्यावा यासाठी शासनाला निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगून संघटना प्रवासी हितासाठी प्रयत्नशील राहिल असे प्रवासी संघटने चे अध्यक्ष राजेश मारवाड़ी यांनी सांगितले.
Tags
news
