आदिवासी कातकरी बांधवांच्या जमीनीवर अतिक्रमण आदिवासी कातकरी बांधवांना न्याय मिळावा, बिरसा फायटर्सची मागणी




मुरबाड: श्री. गणपत परसू वाघ मौजे टेमगाव तालुका मुरबाड जिल्हा ठाणे यांची जमीन गट क्रमांक 26 ही स्वतःच्या  मालकीची जमीन आहे. तरी सदर जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. सदर जमिनीवर जबरदस्तीने बांधकाम करण्यासाठी दबाव आणला जात आहे. म्हणून सदर जमिन मालक गणपत वाघ यांनी एक नोटीस बोर्ड त्यांच्या जमिनीवर लावले आहे. त्या बोर्डवर लिहण्यात आले आहे की, सर्व लोकांना कळविण्यात येते की,  सदरची जमीन गट नं.26 मौजे टेमगाव तालुका मुरबाड हद्दीत असून श्री. गणपत परसू वाघ आदिवासी कातकरी यांचे मालकीची आहे. सदर जागेत अतिक्रमणाबाबत कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. त्याचे निवारण झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे बांधकाम करू नये,याची नोंद घ्यावी. 
               याबाबत बिरसा फायटर्स संघटनेने कोकण विभाग प्रमुख राजाभाऊ सरनोबत यांनी तहसीलदार मुरबाड यांना नुकतेच निवेदन दिले आहे. निवेदन देताना जमीन मालक गणपत वाघ सह बिरसा फायटर्स मुरबाड चे अनेक  पदाधिकारी व  सदस्य उपस्थित होते. यावेळी आदिवासी कातकरी बांधवांच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण थांबवून न्याय देण्यात यावा.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने