माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न - आ. काशिराम पावरा यांचे मनोगत, वाघाडी येथे शिरपूर पॅटर्नच्या चार बंधाऱ्यांचे भूमिपूजन




शिरपूर : माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे शिरपूर तालुक्याच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असून शिरपूर पॅटर्न अंतर्गत शिरपूर तालुक्यात बंधारे बांधण्याची शृंखला नियमितपणे सुरू आहे. शेतकऱ्यांचा शेतीला पाणी मिळण्यासाठी, कुठेही पिण्याच्या पाण्याची समस्या राहू नये, तसेच भूजल पातळी वाढण्यासाठी भाईंचे मनापासून प्रयत्न सुरू आहेत असे मनोगत आ. काशिराम पावरा यांनी व्यक्त केले.


तालुक्यातील वाघाडी येथे शिरपूर पॅटर्न अंतर्गत चार बंधाऱ्यांचे भूमिपूजन आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. शिरपूर पॅटर्न अंतर्गत एक सिमेंट नाला बंधारा दुरुस्तीचे काम क्रमांक 286 तसेच जिल्हा परिषद अंतर्गत लघु सिंचन मार्फत काँक्रीट रिचार्ज बंधारा क्रमांक 287, 288, 289 असे एकूण चार बंधाऱ्यांचे भूमिपूजन करण्यात आले.


यावेळी आमदार काशिराम पावरा, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ऍड. बाबा पाटील, वाघाडी येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष श्रीराम माळी, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष किशोर माळी, उपसरपंच योगेश पाटील, सदस्य धनराज पाटील, आसिफ खाटीक, शांतीलाल पाटील, योगेश चौधरी, जीवन कोळी, प्रशांत भामरे, शेतकरी रामदास धोबी, मुन्ना ईशी, यशवंत सैंदाणे, शिरपूर पॅटर्नचे प्रोजेक्ट डायरेक्टर टी. आर. दोरिक, कर्मचारी, अनेक शेतकरी, ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.


प्रास्ताविकात शिरपूर पॅटर्नचे प्रोजेक्ट डायरेक्टर टी. आर. दोरिक यांनी शिरपूर पॅटर्न बाबत माहिती दिली. सूत्रसंचालन करुन ऍड. बाबा पाटील यांनी आभार मानले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने