महाराष्ट्र धोबी समाजातर्फे नाशिक येथे समाज रत्नभुषण पुरस्काराने एकनाथराव बोरसे यांचा गौरव शिरपूरात आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते सत्कार




       शिरपूर : शिरपूर शहरासह महाराष्ट्रात गेली चालीस वर्षापासुन धोबी समाज संघटन करीत असलेले येथील अखिल भारतीय धोबी महासंघ राष्ट्रीय उपाध्यक्ष  एकनाथराव रुपचंद बोरसे यांना नाशिक येथे राज्यस्तरीय समाज रत्नभुषण पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्यात विविध जिल्ह्यात युवक, महिला मेळावा घेवुन समाज जागृती सतत करीत असलेले एकनाथराव बोरसे यांना महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ कडून सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल शिरपूर येथे आमदार संपर्क कार्यालयात आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धोबी समाज प्रदेश उपाध्यक्ष अरुण धोबी, शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शिरपूर बाराबलुतेदार महासंघ तालुकाध्यक्ष योगीराज बोरसे, शहराध्यक्ष प्रकाश गुरव, गजानन चौधरी, काशिनाथ चौधरी, गुलाब चौधरी आदि उपस्थित होते. नाशिक येथे नुकताच मुंबई महिला दक्षता विभाग अध्यक्षा सौ. विद्या बबुदा कदम यांचा हस्ते एकनाथराव बोरसे यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी व्यासपीठावर परिट (धोबी) सेवा मंडळ प्रदेशाध्यक्ष राजेंद्र खैरनार, नाशिक परिट (धोबी) सेवा मंडळ जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, नाशिकच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा सौ. वाडेकर आदि उपस्थित होते. एकनाथराव बोरसे हे शिरपुर शहर, तालुका व धुळे जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर समाज संघटन करीता राज्यातील विविध जिल्हात सतत फिरत असतात वधु,वर, युवक व महिला मेळावासह समाजाचे मेळाव्यातुन समाज जागृती करीत असतात त्यांचे हे काम अनमोल असुन त्यांनी महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळ यांच्या वतीने हा सन्मान स्विकारला आहे. त्यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल म्हटले आहे की, मला मिळालेला हा पुरस्कार समाजासाठी समर्पित आहे मला ह्या कार्यासाठी माझ्या परिवाराची ही मोलाची साथ लाभली आहे. हा पुरस्कार संपूर्ण शिरपुर शहरातील समाज बांधवांचा आहे. मी फक्त एक निमित्त आहे तरी या पुढेही मी असेच कार्य करत राहील अहे सांगितले. एकनाथराव बोरसे यांचे सामजिक, राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने