पटेल परिवाराच्या दातृत्वातून राजेंद्र बारी यांच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी




शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर शहरातील क्रांतीनगर येथील राजेंद्र भास्कर बारी (वय 30 वर्षे) याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली.



राजेंद्र बारी यांचे वडील मयत झाले आहेत. आई, नातेवाईक मंडळी व मित्रमंडळी यांनी पटेल परिवाराची प्रत्यक्ष भेट देऊन समाधान व्यक्त केले. राजेंद्र बारी यांचे एकूण पाच लोकांचे कुटुंब आहे. घरात वृद्ध आई, भाऊ, मोठ्या वहिणी, पत्नी, एक मुलगी आहे. गरिबीची परिस्थिती व कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतात. वर्षभरापूर्वी विजेच्या पोलवर काम करत असताना त्यांचा अपघात झाला होता. पाय घसरून ते खाली पडले, त्यामुळे उजवा सोल्डर मध्ये दुखापत झाली स्थानिक डॉक्टरांना दाखवले असता त्यांनी एक्स-रे काढला व काही तपासण्या केल्या. त्यांनी सांगितले की तुमच्या सोल्डर मध्ये रक्तवाहिनी फाटलेली आहे तरी तिचे ऑपरेशन अतिशय क्रिटिकल, गुंतागुंतीचे व खर्चिक आहे, ऑपरेशन करावे लागेल, त्यासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च येईल तसेच मुंबई किंवा नाशिक येथे शस्त्रक्रिया होईल असे सांगितले. परंतु, आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची असल्याने शस्त्रक्रिया करू शकत नव्हते. रुग्णाचे मित्र विनय माळी, आनंद बिडकर, दिनेश माळी हे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांचे स्वीय सहाय्यक सुनील जैन यांना भेटले व सर्व हकिगत सांगितली. त्यांनी लगेच उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याशी भेट घालून दिली व पेशंटला मदत करण्याबाबत विनंती केली. भूपेशभाई पटेल यांनी रुग्णसेवक दिलीप माळी यांना पेशंट राजेंद्र बारी याला मुंबई येथे नामांकित हॉस्पिटल मध्ये दाखल करण्याची सूचना केली.



रुग्णसेवक दिलीप माळी यांनी ताबडतोब कागदपत्रांची पूर्तता करून मुंबई येथे नामांकित हॉस्पिटलमध्ये दाखल केले व त्यानंतर यशस्वी शस्त्रक्रिया पूर्ण झाली. खर्चासह रुग्ण व रुग्णा सोबत त्यांचे मित्र यांची राहण्याची, भोजनाची व इतर व्यवस्था पटेल परिवाराच्या सहकार्याने करून देण्यात आली. पटेल परिवाराने रुग्णाला मदतीचा हात पुढे केल्यामुळे रुग्णासह नातेवाईक व मित्र मंडळींना फार आनंद झाला व समाधान लाभले. क्रांती नगर येथील नातेवाईक, मित्र परिवार यांनी जनक विला येथे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांची भेट घेऊन ऋण व्यक्त केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते भालेराव माळी, स्विय सहाय्य्क सुनिल जैन, रुग्णसेवक दिलीप माळी, स्विय सहाय्य्क योगेश्वर
माळी, अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने